मुंबई :  एकीकडे भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध टेस्ट सीरीजसाठी मेहनत घेत आहेत. तर दुसरीकडे काही खेळाडूंच्या घरी लगीन घाई सुरू आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकत्यामध्ये पहिली टेस्ट खेळल्यानंतर आता भुवनेश्वर कुमार लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या २३ नोव्हेंबरला मेरठमध्ये नुपूर नागर सोबत तो विवाहबद्ध होईल. 


पहिली टेसट आटपून लग्नाच्या तीन दिवस आधी भुवनेश्वर घरी पोहचणार आहे. त्यावेळेस शिखर धवनने त्याच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी खास व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. 


लग्नापूर्वीच भुवनेश्वर कुमारचा उल्लेख 'जोरू का गुलाम' असा करत त्याच्याकडून कितपत तयारी झाल्याचं विचारून घेताना दोघांनीही धम्माल मस्ती केली आहे.  



 



कोलकत्याच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या सामन्यानंतर त्याची 'मॅन ऑफ द मॅच'म्हणून निवडही करण्यात आली.  
श्रीलंकेविरूद्धच्या पुढील दोन टेस्ट मॅचसाठी भुवनेश्वर कुमारला आराम देण्यात आला आहे. त्याऐवजी तामिळनाडूचा ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर याचा संघामध्ये समावेश होणार आहे.