इतक्या गोंडस चिमुरडीला घाबरतोय शिखर धवन
भारताचा ओपनिंगचा बॅट्समन शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर जितक्या जबाबदारीने खेळतो तितकाच तो सोशल मीडियावरही सजग दिसतो.
मुंबई : भारताचा ओपनिंगचा बॅट्समन शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर जितक्या जबाबदारीने खेळतो तितकाच तो सोशल मीडियावरही सजग दिसतो.
समाजातील अनेक प्रश्नांवर तो बोट ठेवून त्याच्या चाह्त्यांना मार्गदर्शन करतो. प्रामुख्याने लहान मुलांंच्या प्रश्नांबाबत तो फारच संवेदनशील आहे.
नुकतच शिखर धवनने एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला अअहे. ज्यामध्ये एक चिमुरडी अगदी सहज मोबाईल वापरताना दिसत आहे. तिच्या आवडीप्रमाणे ती झटपट गाणी बदलत आहे. वरकरणी पाहता या निरागस चिमुरडीचा व्हिडिओ तुम्हांला फारच क्युट वाटू शकतो. पण खेळण्याच्या, नवं शिकण्याच्या वयात आजकालची मुलं इंटरनेटच्या जाळ्यात अकडली आहेत. हे वास्तव त्रासदायक आहे.
लहान मुलांना इंटरनेटचा कितपत वापर करायला द्यावा. याबाबत पालकांनी सजग राहणं गरजेचे आहे. त्यासाठीच शिखरचा हा एक प्रयत्न.
शिखरने अधोरेखित केलेलं हे वास्तव तुमच्या आमच्या घरात अगदी हमखास दिसते. मग तुम्हीही शिखर धवनच्या या आवाहनाचा विचार करा नक्की !!!