Shikhar Dhawan, World Cup 2023 : शब्द दिला की करून दाखवणार, असा खेळाडू कोण? असा सवाल विचारल्यावर कोणत्याही क्रिकेटरच्या तोंडून नाव निघेल, ते म्हणजे... शिखर धवन. टीम इंडियाचा गब्बर (Shikhar Dhawan) सध्या डरकाळी फोडताना दिसत नाही, कारण त्याला आगामी वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) संधी देण्यात नाही. 10 वर्षात असं पहिल्यांदा झालंय की शिखर धवनला आयसीसी टुर्नामेंटमध्ये (ICC Matches) संधी मिळाली नाही. आयसीसीच्या इवेन्टमध्ये सर्वात 'भारी' आकडे असतील तर तो शिखर... मात्र, आता सर्वांचा भ्रमनिरास झालाय. मात्र, शिखर धवन मैदानात नसला तरी त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपमधून बाहेर (World Cup 2023) पडल्यानंतर शिखर धवन आता उज्जैन येथे महाकाल मंदिरात (Mahakaleshwar Temple) दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत बॉलिवडूचा स्टार अभिनेता अक्षय कुमार देखील उपस्थित होता. दोघांनी महाकाल मंदिरात आरती केली. त्यानंतर शिखरला विचारलं गेलं की, तू देवाकडे काय मागितलं... त्यावेळी शिखरने जे उत्तर दिलं, ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल.


काय म्हणाला शिखर धवन?


मी इथं देवाचं आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. संपूर्ण भारत टीम इंडियाच्या यशासाठी प्रार्थना केली जात आहे अन् मी सुद्धा आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या यशासाठी प्रार्थना केलीये, असं शिखर धवन (Shikhar Dhawan On Team India) म्हणाला आहे. अक्षय कुमार त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी शिखर धवन देखील त्याच्यासोबत होता.



दरम्यान, शिखरला डावललं गेल्याने आता तमाम क्रिडाप्रेमींचा हिरमोड झाल्याचं पहायला मिळतं होतं. मात्र, शिखरने ट्विट करत सर्वांची मनं जिंकली. 'वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या माझ्या सहकारी सहकारी आणि मित्रांचे अभिनंदन! 1.5 अब्ज लोकांच्या प्रार्थना आणि पाठिंब्याने तुम्ही आमच्या आशा जिवंत ठेवा. प्रत्येक भारतीयाचं स्वप्नं पूर्ण करा. वर्ल्ड कप घरी आणा अन् आम्हाला अभिमान वाटू द्या', असं म्हणत शिखर धवनने टीम इंडियाला पाठिंबा दिला आहे.