नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Cpitals) फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदतीचा हात दिला आहे. ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी शिखर धवनने 20 लाख तसेच त्याच्या सामन्यानंतरच्या वैयक्तिक कामगिरी पुरस्कारातून मिळणारी रक्कम त्याने मिशन ऑक्सिजनसाठी देण्याचा निर्णय जाहीर केला. (Shikhar Dhawan Donate 20 lacs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धवन याने शुक्रवारी एका ट्विटमध्ये याची घोषणा केली. “आम्ही सध्या अभूतपूर्व परिस्थितीत आहोत आणि एकमेकांना मदत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे,” असे धवनने आपल्या निवेदनात म्हटले आहे.



'बर्‍याच वर्षांत मला तुमच्या सर्वांकडून अविश्वसनीय प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे, त्याबद्दल मी चिरंतन कृतज्ञ आहे. आता देशातील लोकांना परत देण्याची माझी वेळ आहे.'


'मी आयपीएल 2021 मध्ये वैयक्तीक कामगिरीसाठी मिळणारी रक्कम तसेच 20 लाख रुपये ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी मिशन ऑक्सिजनला देणगी म्हणून देणार आहे.'