मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या मुलाला भेटू शकला आहे.  शिखर धवनने आपल्या मुलाच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये धवन आपल्या मुलाला आपल्या मांडीवर बसवतो आणि त्याला मिठी मारतो. धवनचा मुलगा 2020 पासून ऑस्ट्रेलियामध्ये होता.कोविडच्या कडक नियमांमुळे धवन देखील ऑस्ट्रेलियाला जाऊन आपल्या मुलाला भेटू शकला नाही.


धवनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "त्याच्यासोबत खेळणे, त्याला मिठी मारणे, बोलणे, हे खूप भावूक करणारे क्षण आहेत. हे असे क्षण आहेत जे कायम आठवणीत राहतील."


गेल्या वर्षी शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत आला होता. जेव्हा त्यांची पत्नी आयेशा मुखर्जीने नऊ वर्षे जुने नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्याने 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केले, त्यानंतर 2014 मध्ये आयशाने जोरावरला जन्म दिला. जोरावर हा मेलबर्नमध्ये त्याच्या आईसोबत राहतो.