कसोटी क्रिकेटमधून हा स्टार खेळाडू संन्यास घेण्याच्या तयारीत?
रोहित शर्मामुळे कसोटी क्रिकेटचं करिअर संपुष्टात? हा स्टार खेळाडू लवकरच घेण्याची शक्यता
मुंबई : कसोटी फॉरमॅटमध्ये खराब फॉर्ममध्ये खेळणारी नावं म्हटलं की अजिंक्य रहाणे किंवा पुजाराचं डोळ्यासमोर येतो. पण या दोन्ही खेळाडूंची नाव नाहीत. तर रोहित शर्मामुळे ज्याचं कसोटी क्रिकेटमधील करिअर धोक्यात आलं असा खेळाडू आता संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
कठीण काळात आपल्या धावांनी टीम इंडियाला सावरणारा स्टार खेळाडू कसोटी फॉरमॅटपासून गेल्या काही दिवसांत दूर राहिला आहे. टी 20 मध्ये उत्तम कामगिरी केली मात्र कसोटी क्रिकेटमध्ये फार संधी मिळू शकली नाही त्यामुळे बेंचवर बसण्याची वेळ या खेळाडूवर आली.
या खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची एकही संधी मिळत नाही. या खेळाडूकडे निवड समिती सातत्याने दुर्लक्ष करत आहे. तो रोहित शर्मासारखा झंझावाती फलंदाजी करण्यात माहीर आहे. एक काळ असा होता की 35 वर्षीय शिखर धवन हा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर मानला जात होता. पण आता शिखर धवनच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात मोठा अडथळा रोहित शर्मा ठरला आहे.
निवड समितीकडून सतत शिखर धवनकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे. रोहितकडे टीमचं नेतृत्व गेल्यानंतर ओपनिंगसाठी मयंक अग्रवाल किंवा के एल राहुलला सिंधी दिली जाऊ शकते. शिखर धवनसाठी सध्या कसोटीचे दरवाजे बंद झाल्याचं दिसत आहे.
धवनने शेवटचा कसोटी सामना 2018 साली खेळला होता. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अव्वल कामगिरी केल्याचं दिसत आहे. कसोटी क्रिकेटमध्येही शिखरने 34 सामन्यांमध्ये 41 च्या सरासरीने 2300 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 7 शतके झळकावली आहेत. पण मयंक अग्रवाल वाईट फॉर्ममध्ये असूनही शिखरला डावलून त्याला संधी दिली जात आहे.
रोहित आणि शिखर धवन यांची ओपनिंग जोडी सुपरहिट म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ शिखर धवनला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याचीच संधी मिळाली नाही. शिवाय फ्लॉप खेळाडूंना सतत संधी मिळत असल्याने सोशल मीडियावरही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.