नवी दिल्ली : नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या सीरिजसाठी टीम इंडिया केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन याच्यासोबत असं काही झालं जे ऐकल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाताना दुबईमध्ये एमिरेट्स एअरलाईन्सने केलेल्या अयोग्य व्यवहारामुळे शिखर धवनला एकट्यालाच केपटाऊनला जावं लागलं. 


शिखर धवन आपली पत्नी आणि मुलांना घेवून केपटाऊनसाठी निघाला होता. मात्र, एमिरेट्स एअरलाईन्सने केलेल्या व्यवहारामुळे शिखर धवनला आपली पत्नी आणि मुलांना न घेताच केपटाऊनसाठी जावं लागलं. या घटनेनंतर शिखर धवनने अनेक ट्विट्स करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.


शिखर धवनने केलं ट्विट


शिखरने ट्विट करत म्हटलं की, मी माझ्या पत्नी आणि मुलांना घेऊन केपटाऊनला जात होतो. मात्र, जन्म प्रमाणपत्र आणि इतर काही कागदपत्र नसल्याने त्यांना दुबईतच थांबावं लागलं. एमिरेट्स एअरलाईन्सकडून खूपच अनप्रोफेशनल व्यवहार मिळाला.




धवनची पत्नी आणि मुलांना दुबईतच थांबावं लागलं. शिखरने ट्विटमध्ये सांगितलं की, जन्म प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची विमानतळावर मागणी करण्यात आली. आम्ही फ्लाईटमध्ये बोर्डिंग करत होतो त्यावेळी एअरलाईन्सकडून हा प्रश्न का विचारला नाही? असा प्रश्नही शिखर धवनने उपस्थित केला आहे.


टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ३ टेस्ट मॅच, ६ वन-डे आणि ३ टी-२० मॅचेस खेळणार आहे.