Shikhar Dhawan ने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन फॅन्सला दिलं सरप्राईज
शिखर धवनने स्वत:चा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे,
मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे आणि आपल्या व्हिडिओ व फोटोंच्या माध्यमातून नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट असतो. शिखर धवन आपल्या फलंदाजीबरोबरच फनकी स्टाईलसाठीही ओळखला जातो.
शिखर धवनने स्वत:चा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बासरी वाजवताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर गब्बरची अशी शैली पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. आपला व्हिडिओ शेअर करताना शिखर धवनने म्हटले की, 'आत्म्यासाठी संगीत, शांत रहा आणि सकारात्मक रहा'.
टीम इंडिया एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी जुलैमध्ये श्रीलंकेत जाणार आहे. या दौर्यावर भारताचा युवा संघ जाईल आणि शिखर धवनला कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते अशा बातम्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये शिखर धवन दिल्ली कॅपिटलमधून खेळताना शानदार फॉर्ममध्ये होता.
धवनने 8 सामन्यांत 134.28 च्या शानदार स्ट्राईक रेटने 380 धावा केल्या. ऑगस्टमध्ये भारताला विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत भारताचा युवा संघ श्रीलंका दौर्यावर जाईल, ज्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारखे स्टार खेळाडू नसणार आहेत.