मुंबई : टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन मैदानावर आपल्या कबड्डी स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याला कोणीच शिखर नावाने हाक मारत नाही. गब्बर हेच त्याच नाव झालंय. शिखर 'कबड्डी स्टाईल' का करतो ? 'गब्बर' नावामागंच रहस्य काय ? यामागचा आता उलगडा झालायं. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन' या टॉक शोमध्ये शिखरने या सर्वाचा खुलासा केलाय.


कबड्डी स्टाईल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरव कपूरच्या टॉक शोमशध्ये शिखरने कब्बडी स्टाईल बद्दल सांगितलं. 'मला कबड्डी बघायला आवडते, माझ्यासाठी हा खूप मनोरंजक खेळ आहे.' मी ही स्टाईल खूप मनापासून करतो कारण लोकांनाही ती आवडते. मी जेव्हा बाऊंड्री लाईनवर उभा असतो तेव्हा स्टेडियममधील प्रेक्षक मला या स्टाईलची नक्कल करताना दिसत असल्याचे' धवनने सांगितले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टेस्ट मॅचमध्ये शेन वॉटसनची कॅच घेतल्यानंतर त्याने पहिल्यांदा ही स्टाईल केली होती.


गब्बर नाव 


या 'टॉक शो'मध्ये शिखरने गब्बर नावाच्या रहस्यावरून पडदा उघडला. 'कोणीच मला शिखर बोलत नाही तर सर्वजण मला गब्बरच म्हणतात. एका रणजी मॅचदरम्यान मला हे नावं मिळालं.विजय दहिया यांनी मला हे नावं दिल्याचे' शिखरने सांगितले. रणजी ट्रॉफीमध्ये विरोधी टीमचे बॅट्समन चांगली पार्टनर्शिप करत असताना आपल्या फिल्डर्सचे मनोबल वाढविण्यासाठी तो शोले सिनेमातील गब्बरच्या कॅरेक्टरचे डायलॉग बोलत असे.