शिखर धवनच्या या `स्पोर्ट्समॅन स्पिरीट`चं होतंय ट्विटरवर कौतुक
भारत विरूद्ध पाकिस्तान असा क्रिकेट सामना असेल तर ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्डही एक `टशन` असतं.
मुंबई : भारत विरूद्ध पाकिस्तान असा क्रिकेट सामना असेल तर ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्डही एक 'टशन' असतं.
दोन्ही संघांमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक संघर्ष सुरू असतो. पण खेळाडू म्हणून प्रत्येकानेच समोरच्या व्यक्तीचा आदर राखायला हवा. भारत - पाकिस्तान संघातील जुनी दुश्मनी मागे सारून शिखर धवनने शोएब मलिकला ट्विटरवरून त्याच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.
नेमके काय घडले ?
काही दिवसांपूर्वी शोएब हेल्मेट न घालता फलंदाजीला उभा होता. अशावेळेस थेट डोक्याला बॉल धडकल्याने तो मैदानात बेशुद्ध पडला होता. अनेक माध्यमातून या गोष्टीची चर्चा झाली.
शिखरची विचारपूस
भारतीय क्रिकेट संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर असलेल्या शिखर धवनने शोएबची ट्विटरच्या माध्यमातून चौकशी केली. यानंतर शिखरवर पाकिस्तानी फॅन्सकडून काही ट्विट्स यायला सुरूवात झाली.
पाकिस्तानी फॅन्सनी केलं कौतुक
शिखर धवनच्या स्पोर्टमनशिपचं ट्विटरकरांनी कौतुक केले आहे. त्याचे आभार मानले आहेत. ही गोष्ट दोन्ही देशांकडून व्हायला हवी अशा आशयाचेही काही ट्विट केले आहेत.