श्रीसंत स्पॉट फिक्सिंग : बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयकला यासंदर्भात उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.
नवी दिल्ली : 'श्रीसंत स्पॉट फिक्सिंग प्रकरणा'ला आता वेगळे वळण लागले आहे.
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयकला यासंदर्भात उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.
२०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी सापडलेल्या श्रीसंतवर लाईफ टाईम बॅन लावण्यात आला. श्रीसंतने केरळ हायकोर्टमध्ये यासंदर्भात याचिका दाखल केली.
श्रीसंतशिवाय राज्यस्थान टीमच्या इतर २ खेळाडू अंकित चव्हाण आणि अजीत चंडिला यांना जुलै २०१५ मध्ये दोषमुक्त केले होते.
बंदी कायम
इंडियन प्रिमियर लीग २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांत त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती.
१८ सप्टेंबर २०१७ रोजी कोर्टानं त्याला या आरोपांतून मुक्त केलं होतं.
परंतु, बीसीसीआयनं दाखल केलेल्या याचिकेननंतर १७ ऑक्टोबर रोजी केरळ हायकोर्टाच्या खंडपीठानं बीसीसीआयचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत त्याच्यावरची खेळण्याची बंदी कायम ठेवलीय.
'बीसीसीआय प्रायव्हेट बॉडीच'
'मला बीसीसीआयनं बॅन केलंय... आयसीसीनं नाही... जर भारत नाही तर मी दुसऱ्या एखाद्या देशासाठी क्रिकेट खेळू शकतो.
मी ३४ वर्षांचा आहे आणि जास्तीत जास्त आणखी सहा वर्ष क्रिकेट खेळू शकतो...
बीसीसीआय एक खाजगी संस्था आहे.हे आपण आहोत जे याला भारतीय क्रिकेट टीम म्हणतो, परंतु, शेवटी बीसीसीआय ही प्रायव्हेट बॉडीच आहे...' असं श्रीसंतनं म्हटलंय.