बाप रे! शोएब अख्तरचा संताप सुटला; बॅट घेऊन खेळाडूला मारायला सुटला
शाहिद आफरीदीने शोएब अख्तरचा संताप अनावर झाल्यानंतर त्याने काय केलं होतं त्याचा खुलासा केला.
मुंबई: शोएब अख्तरचा आक्रमकपणा तर सर्वांनी मैदानात पाहिला आहे मात्र त्याचा संताप सुटला की काय होतं याचा खुलासा चक्क 13 वर्षांनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफरीदीने केला आहे. माजी गोलंदाज शोएब अख्तरसंदर्भात त्याने एक किस्सा शेअर करत प्रसंगाबाबत खुलासा केला आहे.
शाहिद आफरीदीने 2007 साली घडलेली घटना सांगितली आहे. शोएब अख्तरचा राग मी पहिला आहे. आसिफने मजा करत असतात माझी साथ दिली. त्यामुळे शोएब नाराज झाला. त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने आसिफच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचत आणि आसिफला मारण्याचा प्रयत्न केला.
ज्यामुळे शोएब संतापला आणि हे सर्व घडले. जेव्हा आपण आपल्या सहकाऱ्यांसह कुटुंबासारखे राहता तेव्हा अशा गोष्टी संघामध्येच घडतात. असे काही लोक आहेत जे एकमेकांची चेष्टा करतात आणि काही लोक ज्यांना हे सहन होत नाही. त्यामुळे त्यातून असे प्रकार घडतात असा खुलासा अफरीदीने केला आहे. 2007च्या ICC टी 20 वर्ल्डकप दरम्यान हा सगळा प्रकार घडला होता.
अझहरच्या बायकोविषयी असं बोलणं पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हकला सहन झालं नाही...
अफरीदी म्हणाली, 'शोएब अख्तर मनापासून खूप चांगला आहे. सर्व आक्रमकता असूनही, तो एक हुशार व्यक्ती आहे. वेगवान गोलंदाजासाठी हे स्वाभाविक आहे. अख्तरने त्यांच्या आत्मचरित्रामध्ये या घटनेविषयी सांगितलं आहे. तिथे त्याने अफरीदीवर देखील आरोप केला होता.