मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात केवळ खेळाडूंचा कडवा संघर्ष नसतो तर या सामन्यात देश आणि भावनाही जोडलेल्या असतात. बऱ्याचदा मैदानात एकमेकांविरुद्ध खेळाणारे भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हे मैदानाबाहेर खूप चांगले मित्र असल्याची घटना समोर आल्या आहेत. एकेकाळी पाकिस्तान संघाचा कर्णधार असलेला इंझमाम उल हक आणि अझहरच्या मैत्रीचा एक किस्सा खूप चर्चात आला होता.
पाकिस्तान संघातील इंझमाम उल हक आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार अझहर हे मैदानाबाहेर खूप चांगली मित्र आहेत. 1997 च्या सामन्यादरम्यान एक प्रसंग घडला होता. ज्यामुळे इंझमान आणि अझरची मैत्री संपूर्ण जगानं पाहिली तर पाकिस्ताननं त्याच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी आणली होती.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार यूनिस याने हा किस्सा एका मुलाखतीदरम्यान सांगितला आहे. सामना सुरू असताना मैदानात आलू आलू असा नारा सुरू होता. इंजीने त्याकडे कानाडोळा केला आणि आपला राग शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रेक्षकांमधील एका व्यक्तीनं अझहरच्या पत्नीवर वाईट कमेंट केली.
त्या व्यक्तीची कमेंट इंजीला सहन झाली नाही आणि त्याचा संतापाचा पारा सुटला. क्रिकेटर इंझमाम-उल-हक एकाला फटकावायला निघाला होता. त्यावेळी त्याला रोखण्याचा प्रयत्नही झाला. पाकिस्तान संघाने त्याच्यावर 2 सामन्यांसाठी बंदी आणली. पुढे हे प्रकरणी न्यायालयापर्यंत गेलं. अजहरने मध्यस्ती करत प्रकरण पुढे वाढू न देता मिटवलं.