मुंबई : 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएबचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये त्यानं ओठांवर डार्क शेडची लिपस्टिक आणि डोळ्यांवर आयशॅडो वापरलेली दिसतेय. 


शोएब 'जिओ खेलो पाकिस्तान' नावाच्या एका कॉमेडी शोमध्ये परिक्षक म्हणून उपस्थित झाला होता. यावेळी, त्यानं केलेला मेकअप थोडा जास्तच झालेला दिसत होता.


या व्हिडिओत शोएब लहानपणच्या काही आठवणी शेअर करताना दिसतोय. पण, फॅन्सचं लक्ष मात्र त्याच्या बोलण्याकडे नाही तर त्याच्या मेकअपकडेच लागलेलं दिसतंय.