मुंबई : पाकिस्तानचा संघ हा सध्या बांगलादेश (Pak vs Ban) दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 19 नोव्हेंबर रोजी मालिकेतील पहिला टी-20 सामना खेळला गेला. यामध्ये पाकिस्तान संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. सामना खूपच रोमांचक झाला, पण शेवटी पाकिस्तानने बाजी मारली. (Shoib Malik Run out)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आला. (Shoib malok troll on social media)


वास्तविक या सामन्यात 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने 23 धावांत तीन मोठ्या विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शोएब मलिककडून संघाला मोठ्या आशा होत्या, मात्र तो 3 चेंडू खेळून एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. 22 वर्षे क्रिकेट खेळणारा शोएब ज्या पद्धतीने धावबाद झाला, त्यावर चाहत्यांनी टीका केली.



पाकिस्तानी डावाच्या 5व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बॉल शोएबच्या बॅटला लागून यष्टिरक्षक नुरुल हसनच्या हातात गेला. यादरम्यान शोएबने धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो परतला.


यादरम्यान शोएबने बॅट क्रीझमध्ये ठेवली नाही, तेव्हाच नुरुलने ही संधी सोडली नाही आणि शोएबला आऊट केलं. शोएबचा हा आळस म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा, त्याने आपली विकेट गमावली.


या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावत 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 6 गडी गमावून 132 धावा केल्या आणि सामना जिंकला.


सामन्याच्या एका क्षणी पाकिस्तानने 96 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. येथून संघाला विजयासाठी 19 चेंडूत 32 धावांची गरज होती. मात्र शादाब खानने 10 चेंडूत 21 धावा आणि मोहम्मद नवाजने 8 चेंडूत 18 धावा करत सामन्याचे चित्र फिरवले.