नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काहीही घडू शकतं. कुठला बॉलर कधी विकेट घेईल किंवा कुठला बॅट्समन कधी रेकॉर्ड करेल याचा काहीही अंदाज लावू शकत नाही.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा सिक्सर किंग अर्थात युवराज सिंग याने एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर लगावत रेकॉर्ड केला. त्यानंतर आता पुन्हा असं कुणी करु शकणार नाही असं बोललं जात होतं. मात्र, त्यानंतर अनेक बॅट्समनने हा कारनामा केला. 


टी-१० क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या शोएब मलिक याने ६ बॉल्समध्ये सहा सिक्सर लगावले आहेत. यासोबतच त्याने युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 


शोएब मलिक याने शाहिद अफ्रिदी फाऊंडेशनच्या चॅरिटी मॅच दरम्यान एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्सर लगावले. शोएब मलिकने हा कारनामा बाबर आजम याच्या ओव्हरमध्ये केला. 


शोएब मलिक याने २६ बॉल्समध्ये ८४ रन्सची जबरदस्त इनिंग खेळली. त्याच्या या इनिंगमुळे शाहिद अफरिदी फाऊंडेशन रेड टीमने १० ओव्हर्समध्ये २०१ रन्स बनवले. मात्र, तरिही रेड टीमला पराभवाचा सामना करावा लागला.



२०२ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ग्रीन टीमने १ विकेट गमावत ही मॅच जिंकली. ग्रीन टीमकडून बाबर आजम याने स्फोटक बॅटिंग करत एक नवा रेकॉर्डही केला. बाबरने २६ बॉल्समध्ये सेंच्युरी केली. यामध्ये त्याने ११ सिक्सर आणि ७ फोर लगावले.