मुंबई : टीम इंडियाचे अनेक वेगवान गोलंदाज गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंज देतायत. नुकतं हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह दुखापतीतून बरे होऊन संघात परतले आहेत. दरम्यान, भारतीय चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. यावेळीही एक वेगवान गोलंदाज जखमी झाला आहे. हा खेळाडू त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.


हा वेगवान गोलंदाज जखमी झाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुलीप ट्रॉफी सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळली जातेय. या स्पर्धेत उत्तर विभागाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त झालाय. नवदीप सैनीला हॅमस्ट्रिंगमुळे मधल्या सामन्यात गोलंदाजीतून माघार घ्यावी लागली होती. गोलंदाज नवदीप सैनीने या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 11.2 ओव्हर टाकल्या आणि दुसऱ्या डावात तो गोलंदाजीसाठी आला नाही. 


मिळालेल्या माहितीनुार, नवदीप सैनी लवकरच एनसीएमध्ये रिपोर्ट करणार आहेत.


नवदीप सैनी डेथ ओव्हर्समध्ये घातक गोलंदाजी करतो. पण त्याचा टीम इंडियामध्ये समावेशही करण्यात आला आहे. नवदीप सैनीकडे 140 किलोमीटरहून अधिक वेगाने बॉल टाकण्याची क्षमता आहे. नवदीप सैनी टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलाय.


2019 मध्ये पदार्पण केले


नवदीप सैनीने 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय T20, त्याने त्याच वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पण सामना देखील खेळला. 2021 पासून त्याला टीम इंडियात एकही सामना खेळायला मिळालेला नाही. नवदीपने भारतीय संघासाठी 2 कसोटी सामन्यात 4 बळी, 8 एकदिवसीय सामन्यात 6 विकेट आणि 11 टी-20 सामन्यात 13 बळी घेतले आहेत.