Shane Warne : गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न ( Shane Warne ) चं निधन झालं. त्याच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. मार्च 2022 मध्ये शेन वॉर्न त्याच्या हॉटेल रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. ज्यावेळी त्याला रूग्णालयात नेलं तेव्हा त्याला मृत घोषित केलं होतं. त्यावेळी वॉर्नच्या मृत्यूचं ( Shane Warne Death ) कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता तब्बल एका वर्षानंतर शेन वॉर्न ( Shane Warne ) याच्या निधनाच्या कारणाचा खुलासा झाला आहे. 


Shane Warne च्या मृत्यूबाबत मोठा खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युकेमधील कार्डिओलॉजिस्ट डॉ. असीम मल्होत्रा ​​आणि ऑस्ट्रेलियन मेडिकल प्रोफेशनल्स सोसायटी ( AMPS ) चे अध्यक्ष डॉ. ख्रिस नील यांनी याबाबत खुलासा केला. डॉक्टरांनी अशी शंका व्यक्त केलीये की, शेन वॉर्नचा ( Shane Warne ) गेल्या वर्षी अचानक मृत्यू Covid mRNA लसीमुळे झाला असावा. असा दावा करण्यात येतोय की, शेन वॉर्नने ( Shane Warne ) मृत्यूच्या सुमारे नऊ महिने आधी ही लस घेतली होती. 


यावेळी डॉक्टरांनी असं नमूद केलंय की, संशोधनामध्ये असं आढळून आलंय की, कोविड-19 च्या mRNA लसीमुळे कोरोनरीमध्ये झपाट्याने वाढ होते. खासकरून ज्यांना आधीपासून सौम्य हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे अशा रूग्णांमध्ये याची शक्यता जास्त आहे. 


तज्ज्ञ पुढे म्हणाले की, फायझरच्या mRNA कोविड-19 लसीचे दोन डोस घेतल्यानंतर धमन्यांमधील काही सौम्य प्लेक्स झपाट्याने वाढले असावेत. मुख्य म्हणजे ही बाब मी माझ्या रुग्णांसोबत घडलेलं पाहिलंय. इतकंच नव्हे तर माझ्या वडिलांचंही निधन असंच झालं. 


हॉटेलच्या रूममध्ये बेशुद्ध होता शेन वॉर्न


4 मार्च 2022 रोजी शेन वॉर्न त्याच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडला होता. यानंतर चौकशी करून त्यांना रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. त्याच्या अचानक जाण्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर शोक व्यक्त केला होता.