काय करावं हेच कळलं नाही...; पराभवानंतर Shreyas Iyer चं विचित्र वक्तव्य
दिल्लीविरूद्ध झालेल्या पराभवानंतर श्रेयस अय्यरने विचित्र वक्तव्य केलं आहे.
मुंबई : KKR vs DC काल खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताचा पराभव झाला आहे. दिल्लीने कोलकात्याला जिंकण्यालाठी 216 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. यावेळी कोलकाताच्या टीमने 19.4 ओव्हरमध्ये 171 रन्स करून बाद झाला. या पराभवानंतर श्रेयस अय्यरने विचित्र वक्तव्य केलं आहे. श्रेयसच्या म्हणण्यानुसार, खेळादरम्यान कळतंच नव्हतं की नेमकं काय करावं.
सामन्यानंतर बोलताना कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, पृथ्वी आणि वॉर्नरने दिल्लीसाठी चांगली सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्याचं खेळावर वर्चस्व होतं. खरं सांगायचं तर, त्यावेळी आम्हाला काय करावं हेच कळत नव्हतं.
फलंदाजीसाठी ती चांगली खेळपट्टी होती. लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही तीन सामने जिंकले पण आजचा दिवस काही खास नव्हता, असंही श्रेयसने सांगितलं आहे.
श्रेयस पुढे म्हणाला, "आम्ही चांगली सुरुवात केली नाही. मधल्या ओव्हर्समध्ये आम्ही चांगला खेळ केला मात्र आम्ही विकेट गमावल्या. फलंदाज म्हणून हे करणं अवघड काम नाही. आम्हाला खेळामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे."
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 19 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकातावर 44 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी दिलेल्या 216 धावांचे आव्हान दिले. मात्र कोलकाताची टीम 19.4 ओव्हरमध्ये 171 धावांवर ऑलआऊट झाली.