नवी दिल्ली : क्रिकेटर्स असो किंवा इतर खेळाडू आपल्या खेळासाठी ते अत्यंत मेहनत घेत असतात. मात्र काही वेळेस ते मज्जा-मस्ती, पार्टी करताना देखील दिसतात. भारतीय संघाची अशी मज्जा मस्ती आपण अनेकदा पाहिली असेल पण श्रीलंकन टीमचा मस्तीभरा अंदाज तुम्ही पहिला नसेल. मात्र एका इव्हेंटमध्ये श्रीलंकन खेळाडूंचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळाला. 'डायलॉग क्रिकेट अवॉर्ड्स'मध्ये एक रोमॅन्टिक गाणे गाऊन या खेळाडूंनी सर्वांचे मन जिंकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 डायलॉग क्रिकेट अवॉर्ड्स या कार्यक्रम मंगळवारी होता. या कार्यक्रमाला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यात भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांनी देखील उपस्थिती लावली. 


 या कार्यक्रमात खेळाडूंनी खूप मस्ती केली. त्याचबरोबर तामिळ गाणे गायले. त्याचबरोबर 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातील  'पहला नशा... पहला खुमार...' हे गाणे गाऊन सर्वांची मने जिंकली. 


यात खेळाडूंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. स्पिनर रंगना हेराथला  'बेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर' देऊन गौरविण्यात आले. तर 'बेस्ट टेस्ट बॅट्समन' पुरस्कार कुशल मेंडिस याला आला कोलंबो येथे झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन  श्रीलंका क्रिकेट बोर्ड ने केले होते. 



'बेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर' चा मानकरी ठरलेल्या रंगना हेराथला 'बेस्ट टेस्ट बॉलर' पुरस्कार देखील मिळाला. 'बेस्ट ऑल राउंडर' किताब दिलरुवान परेरा याने पटकावला. 'बेस्ट वनडे बॉलर' पुरस्कारावर देखील कुशल मेंडिस आपले नाव कोरले. 


'बेस्ट वनडे ऑल राउंडर' हा पुरस्कार सुरंग लकमल आणि 'बेस्ट टी-20 बॅट्समन' हा पुरस्कार असेला गुरुरत्ने याला मिळाला. तर लसिथ मलिंगा हा बेस्ट टी-20 बॉलर' चा मानकरी ठरला.