मुंबई : क्रिकेटर एस.श्रीसंथ सध्या कलर्सच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 10' मध्ये दिसतोय. बिग बॉसच्या घरात त्याने 10 वर्षांपूर्वी त्याच्यासोब झालेल्या कॉन्ट्रवर्सीचा खुलासा केलायं. 2008 सीझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब दरम्यानच्या मॅचमध्ये हरभजनने श्रीसंथच्या श्रीमुखात लगावल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. या घटनेनंतर श्रींसंथ फिल्डवरच रडू लागला होता. या घटनेनंतर हरभजनला पुढच्या मॅचमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. सुरभी राणाला बिग बॉसने रिपोर्टर बनवंल होतं. त्यावेळी तिने हरभजनने कानाखाली मारलेला किस्सा श्रीसंथला आठवण करून दिला. त्यावेळी श्रीसंथने तात्काळ याचं उत्तर दिलं.


'मी आक्रमक झालो' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मला आजही आठवतंय 2008 मध्ये जेव्हा मुंबई इंडियन्स विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब दरम्यान चंढीगडला झालेली मॅच मी खूपचं गांभीर्याने घेतली ही माझी चूक होती. मी खूपचं आक्रमक झालो होतो. भज्जीचं ते लोकल ग्राऊंड होतं आणि तो कॅप्टनही होता.


त्याने मॅचच्या आधीच सांगितलं होतं की, श्री ही काही इंडिया-पाकिस्तान मॅच नाहीय..त्यामुळे आरामात...त्यानंतर मॅचमध्ये तो बॅटींग करायला आल्यावर मी पहिल्या बॉलमध्येच त्याचा विकेट घेतला. यानंतर मी जरा जास्तचं आनंद व्यक्त केला ज्यामुळे तो थोडासा नाराज झाला'  असे श्रीसंथ म्हणतो.


जे दिसलं ते खरं नव्हतं  


जे व्हिडिओमध्ये दिसलं नाही ते सत्य मला सांगायचंय..मैदानात मी जेव्हा हात मिळवायला गेलो तेव्हा 'हार्ड लक पाजी' असं मी म्हणालो. त्यावेळी त्याने माझ्या चेहऱ्यावरून हात उचलला, कानाखाली मारलं नाही. त्याला कानाखाली मारलं असं म्हणता येणार नाही. मला वाटलं असतं तर मी रिअॅक्ट झालो असतो.


भज्जी असं काही करेल मला वाटलं नव्हतं. आम्ही दोघांनीही आपली लाईन क्रॉस केली होती. यामध्ये कोण्या एकाची चूक नव्हती.


तो मला सांथा म्हणायचा आणि मी त्याला मोठ्या भावाप्रमाणे मानायचो. तो असं काही करेल हे माझ्यासाठी शॉकिंग होतं. रागाच्या भरात हा माणूस असं काही करेल तर तुम्ही काय कराल ? हा विचार करून मी स्वत:ला असहाय्य समजलो. त्यावेळी मी आपल्या भावनांना आवर घालू शकलो नाही आणि जोरजोराने रडू लागलो, असे श्रीसंथने सांगितले.


माझा मोठा भाऊ 


पण आजही आमच्या दोघांच नातं खूप चांगलं आहे. यानंतर हरभजनने या घटनेबद्दल माफी मागितल्याचेही श्रींसथने सांगितले.


तो माझ्यासाठी ट्वीट करतो, माझ्या पत्नीशी फोनवर बोलतो आणि मुलांचीही चौकशी करतो असेही त्याने सांगितले. जुन्या गोष्टी संपल्या आहेत आता तसं काही नाहीय.


आजही मी भज्जीला मोठा भाऊच मानतो, असेही श्रीसंथने शेवटी सांगितले.