गुजरात लॉयन्सने 6 कोटी मोजलेल्या खेळाडूला पांड्याची पसंती, Playing11 दिलं स्थान!
आजच्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात दोन्ही पदार्पणवीर आयपीएलमधील गुजरात लॉयन्स संघातील खेळाडू आहेत.
Ind vs Sl 1 T20 Match : श्रीलंका आणि भारतामध्ये पहिला टी-20 सामना (IND vs SL T20 Match) सुरू आहे. टीम इंडियाच्या यंगिस्तानमधून अंतिम अकरामध्ये दोन युवा खेळाडू टी-20 पदार्पण करणार आहेत. यामध्ये शिवम मावी आणि शुभमन गिलचा समावेश आहे. शिवम गिलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना आहे. (Shubham Mavi Debuted in Ind vs SL 1st T20 Match Who also Part of Gujarat Lions in IPL 2023)
हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदाखाली उतरलेल्या संघात शिवम मावीला स्थान देण्यात आलं आहे. योगायोग म्हणजे आयपीएलच्या पार पडलेल्या लिलावामध्ये गुजरात लॉयन्सने शिवम मावीला 6 कोटी रूपये खर्च करत आपल्या ताफ्यात घेतलं आहे. गुजरातने कोटींची बोली लावल्यावर आता पंड्याने अंतिम 11 मध्ये घेत शिवम मावीला मोठी संधी दिली आहे.
शिवम मावी याआधी कोलकाताकडून खेळत होता. कोलकाताने रीलीज केल्यावर यंदाच्या लिलावात शिवमला संघात घेण्यासाठी तीन संघांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. कोलकाताने शिवमला 40 लाखाच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर राजस्थानने यामध्ये उडी घेतली. शिवमला शेवटी राजस्थानने 5 कोटी 40 लाखांची बोली लावली मात्र गुजरातने 6 कोटींची बोली लावत त्याला खरेदी केलं.
शिवम मावीसोबत शुभमन गिलनेही आज पदार्पण केलं आहे. आयपीएलमध्ये शुभमन गुजरात लॉयन्स संघाकडून खेळतो. आजच्या सामन्यात दोन्ही गुजरातच्या खेळाडूंनी पदार्पण केल्याने क्रीडा वर्तुळात याची मोठी चर्चा आहे. शुभमनला मोठी खेळी करता आली नाही. 7 धावा काढून तो बाद झाला. श्रीलंकेच्या तीक्ष्णाने त्याला बाद करत भारताला पहिला धक्का दिला.