Shubham Gill Record :  भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या सामन्यामध्ये  (ind vs nz 3rd)सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी द्विशतकी सलामी दिली आहे. सामना सुरू झाल्यापासून दोघांनी आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंडच्या बॉलिंगची हवा काढून टाकली. रोहित शर्माने तीन वर्षांनंतर शतक करत शतकांचा दुष्काळ संपवला आहे. तर दुसरीकडे शुभमन गिलनेही शतक ठोकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Shubhaman gill hit 4th ODI century vs new Zealand make record of highest run scored in any bilateral series ind vs nz 3rd odi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलने त्याच्या कारकीर्दीतील चौथं शतक पुर्ण केलं आहे. अवघ्या 72 चेंडूत शुभमनने 125 च्या स्ट्राईक रेटने आपलं शतक मारलं आहे. शुभमन गिलने आपल्या शतकी खेळीमध्ये 13 चौकार आणि 5 षटकार मारले. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे. द्विपक्षीय वनडे मालिकेत 300 पेक्षा जास्त धावा करणारा गिल भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. 


शुभमनने पहिल्या सामन्यात 208 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 40 नाबाद  तर शेवटच्या सामन्यामध्ये 112 धावा करत या मालिकेमध्ये एकूण 360 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा बाबर आझमने याआधी 206 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध 360 धावा केल्या होत्या. या विक्रमाशी शुभमनने बरोबरी केली आहे. विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत 283 धावा केल्या होत्या.


शुभमनने सर्वात कमी डावांमध्ये चौथं शतक झळकवलं आहे. याआधी हा विक्रम शिखरच्या नावावर होता, शिखरने  24 डावांमध्ये 4 शतके केली होतीत. मात्र शुभमन गिलने अवघ्या 21 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. 


रोहित आणि शुभमनने 200 धावांची सलामी देत संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली होती. रोहित शर्माने शतक करत कारकिर्दीमधील 30 शतक पूर्ण केलं आहे. या शतकाच्या जोरावर रोहितने वनडेमध्ये रिकी पॉंन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.