मेक्सिको : जागतिक गोल्फ चॅम्पीयनशीपच्या दिसऱ्या पर्वातही भारतीय गोल्फपटू शुभंकरची कामगिरी दमदार राहिली आहे. सर्वांनाच चकीत करत गेल्या रात्री शुभंकरने दोन शॉटने आपली आघाडी कायम ठेवली.


जगज्जेता होण्याची चिन्हे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ वर्षीय शुभंकरने तिसऱ्या पर्वात दोन अंडर ६९ कार्ड खेळले. त्यामुळे पुढचे १८ होल त्याच्यासाठी अत्यंत साधारण असतील. शुभंकरने जर ही चॅम्पीयनशीप जिंकली तर, तो सर्वात कमी वयाचा गोल्फ जगज्जेता ठरणार आहे. यापूर्वी हा विक्रम पेट्रीक रीडच्या नावावर आहे. २०१४ मध्ये पॅट्रीकने २३व्या वर्षी सर्वात कमी वयाचा गोल्फ जगज्जेत्ता होण्याचा विक्रम केला होता.


शुभंकर दुसऱ्या क्रमांकावर


दरम्यान, शुभंकरने ४२ बारच्या पीजीए टूर विजेता फिल मिकेलसन (६५), टायरेल हॅटन (६४) र्सिगयो गाल्सया (६९) आणि राफा कबरेरा बेलो (६९) यांच्यावर आघाडी मिळवली आहे. दरम्यान, जगातील क्रमांक एकचा आणि गेल्या वेळी चॅम्पीयन डस्टिन जॉनसन याने ६८ कार्ड खेळले असून, संयुक्त रूपात तो सहाव्या स्थानावर आहे. तर, शुभंकर अवघ्या तीन शॉटने मागे आहे.