Shubman Gill: आयपीएल 2024 मध्ये 24 वा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. गुजरातचा यंदाच्या सिझनमधील हा तिसरा विजय होता. संजू सॅमसन आणि रियान परागच्या जोरावर आरआरने गुजरातविरुद्ध 196 रन्स केले. राजस्थानच्या डावाच्या 17व्या ओव्हरमध्ये असं काही घडलं की गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल वादाच्या भोवऱ्याच सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा 17 वी ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हा वाद झाल्याचं दिसून आलं. ओव्हरचा शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता. या बॉलचा रिव्ह्यू केल्यानंतर, थर्ड अंपायरने पहिल्यांदा तो योग्य बॉल असल्याचं मानलं. मात्र दुसऱ्यांदा रिव्ह्यू केल्यानंतर त्या बॉलला वाईड करार देण्यात आला.


गुजरातचा कर्णधार शुभमन गिल थर्ड अंपायरच्या हो किंवा नाही या निर्णयाने खूपच निराश दिसून आला. तो या विषयावर चर्चा करण्यासाठी मैदानी अंपायर विनोद शेषन यांच्याकडे गेला. या मुद्द्यावर त्याने अंपायरशी चर्चा केली मात्र यावेळी त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेरीस बॉल वाईड घोषित करण्यात आला. या वादानंतर शुभमन गिल सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. पहिल्यांदाच चाहत्यांना गिलचं असं रूप दिसून आलं असेल. 


गिलवर येणार सामन्यांची बंदी?


क्रिकेटमध्ये अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर खेळाडूसमोर कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे थर्ड अंपायरने दिलेल्या वाइडच्या निर्णयावर पंचाशी वाद घालणं शुभमन गिलला महागात पडण्याची शक्यता आहे. यामुळे गिलला दंडही होऊ शकतो. या सामन्यानंतर आयपीएलची शिस्तपालन समिती गिलवर काही कारवाई घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरातवर 3 विकेट्स राखून मात केली. शेवटच्या बॉलवर दोन रन्सची गरज असताना राशिद खानने फोर मारत सामना जिंकवला. या सामन्यातील विजयानंतर गुजरात मोठा फायदा झाला असला तरी राजस्थानला कोणताही तोटा झाला नाहीये. गुजरातची गाडी कॅप्टन शुभमन गिलने (Shubman Gill) रेटली अन् चांगली सुरूवात करून दिली. मिडल ऑर्डर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नसल्याने अखेरीस राशिद खान आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) यांच्यावर भर आला. मात्र, दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळी केली सामना खिशात घातला. 


राजस्थानकडून कुलदीप सेनने 3 विकेट्स घेतल्या अन् युझीने 2 गडी तंबूत धाडले होते. त्याआधी राजस्थान फलंदाजी करताना, रियान आणि संजू या दोघांनी अर्धशतक ठोकलं. गुजरातकडून राशिदने 4 ओव्हरमध्ये केवळ 18 धावा दिल्या अन् 1 विकेट घेतली. तर रियान परागने 48 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 38 बॉलमध्ये 68 धावा केल्या.