IND vs AUS Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ही चार कसोटी सामन्यांची मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे सुरू होणार असू भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ बंगळुरूमध्ये सराव करत आहे. ही मालिका WTC फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याबाबत दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल याचा शून्यावर बाद होण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 126 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज भारतीयांना मागे टाकलंय. मात्र आता शुभमन गिलने कसोटी संघात आपले स्थान पक्के केल्यानंतर तो आता लाल चेंडूवर फटकेबाजी करण्यास सज्ज झाला आहे. आत्तापर्यंत शुभमन गिलने 13 कसोटी सामन्यांच्या 25 डावात फलंदाजी केली आहे. पण  इंग्लंडचा (England) जलद गोलंदाज जेम्स अँडरसनसमोर (James Anderson) मात्र शुभमन गिल जास्त टिकू शकला नाही. कारण कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक फलंदाज शून्यावर बाद करण्यात आॕस्ट्रेलियाच्या ग्लेन मॕकग्रासह (Glenn McGrath) तो आघाडीवर आहे. त्यापैकी एक विक्रम त्याने शुभमन गिल (Shubman Gill) याला शून्यावर बाद करुन आपल्या नावावर केलाय.   


वाचा: 6,6,6,6,6,6...'या' क्रिकेटपटूने 6 चेंडूत 6 षटकार मारून उडवली धमाल, पाहा VIDEO 


गिल शुन्यावर बाद 


शुभमन गिलचा हा व्हिडिओ भारतात खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी मालिकेतील आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. 4 कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघाला कोरोनामुळे पाचव्या कसोटीतून बाहेर पडावे लागले. मात्र त्यानंतर पाचव्या कसोटीसाठी शुभमन गिलचाही संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात अँडरसनने गिलला शुन्यावर बाद करण्यात यश मिळाले. ऑस्ट्रेलियाकडेही मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारखे गोलंदाज आहेत.



शुभमन गिलचा रेकॉर्ड


शुभमन गिलने भारतासाठी 13 कसोटी सामन्यांच्या 25 डावांमध्ये फलंदाजी करत 736 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 32 आहे जी टी-20 आणि एकदिवसीय पेक्षा खूपच कमी आहे. गिलने कसोटीत केवळ एकच शतक झळकावले असून त्याने 4 अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत. तो सध्या जबरदस्त फॉर्ममधून असून एकदिवसीय टी-20 नंतर कसोटीत त्याची फलंदाजी पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.