Shubman Gill Launches Spider Man: टीम इंडियाचा युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने आयपीएलमध्ये (IPL 2023) धुरळा करताना दिसतोय. संघ कोणताही असो, शुभमनने कोणत्याही गोलंदाजांना सुट्टी दिली नाही. पाच अर्धशकत आणि एक दमदार शतक झळकावणारा शुभमन सध्या ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये अग्रेसर आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्लेऑफचं तिकीट देखील मिळवलं आहे. अशातच आता ऐन फायनल समोर असताना शुभमनला भलताच नाद लागलाय, अशी चर्चा क्रिडाविश्वात ऐकायला मिळत आहे. त्याचा एक व्हिडिओ (Viral Video) देखील समोर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिल याने आगामी चित्रपट 'स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' चा (Spider Man) बहुप्रतिक्षित हिंदी आणि पंजाबी ट्रेलर लॉन्च केला आहे. मुंबईमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शुभमनचा अनोखा अंदाज दिसून आला. 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' हा चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भारतीय स्पायडर मॅनमध्ये असणारे कॅरेक्टर 'पवित्र प्रभाकरन' याला शुभमन गिलने आवाज दिलाय. 


'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' हा चित्रपट भारतात 1 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये ज्यावेळी ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यावेळी शुभमन कारवर उभा राहून अनोखी कला दाखवत होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.


पाहा Video 



आत्तापर्यंत खेळण्यात आलेल्या सामन्यात शुभमन गिल याने 13 डावात 576 धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये 14 सिक्स आणि 62 फोर खेचत गुजरातची नौका प्लेऑफ पार केलीये. लहानपणापासून आपण स्पायडरमॅनचा फॅन असल्याचं शुभमनने सांगतो. शुभमन गिल मूळ पंजाबचा, त्यामुळे त्याची हिंदी आणि पंजाबीवर जबर पकड आहे, त्यामुळे आता सर्वांना त्याच्या आवाजातील चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण आतूर असल्याचं दिसतंय.