Shubman Gill, WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. सामना आता रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 280 धावांवर डाव घोषित केला, त्यामुळे टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतासमोर 443 धावांचे आव्हान आहे. त्यासाठी आता भारतीय फलंदाज वनडेच्या स्टाईलने फलंदाजी करत असल्याचं दिसतंय. ऑस्ट्रेलियाने (AUS vs IND) दिलेल्या डोंगराऐवढ्या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि रोहित शर्माने आक्रमक सुरूवात करून दिली. मात्र, शुभमन गिलची (Shubman Gill) विकेट गेल्याने टीम इंडिया पुन्हा बॅकफूटवर आल्याचं दिसतंय. शुभमन गिलची विकेटवरून अनेक सवाल उपस्थित होताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिल आता रंगात आला होता. बॉलवर पूर्ण सेट झाल्याचं दिसत होतं. त्यामुळे शुबमनने आक्रमक अंदाज सुरू ठेवला. शुभमन 18 धावांवर खेळत असताना त्याने स्लिपमध्ये चेंडू मारला. त्यावेळी कॅप्टन कमिन्सने 4 स्लीप मागे लावल्या होत्या. स्लिपमध्ये असलेल्या कॅमरून ग्रीनने (Cameron Green) शुबमनचा झेल पकडला. झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळालं. त्यामुळे रोहित आणि शुभमनने बॉल पकडला की नाही? याची मागणी थर्ड अंपायर्सकडे केली. त्यावेळी अद्यायावर तंत्रज्ञान असताना देखील थर्ड अंपायरने व्हिडीओ झूम केला नाही आणि शुभमनला आऊट घोषित केलं. त्यावरून भारतीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.


आणखी वाचा - "कोच म्हणून राहुल द्रविड झिरो, देव अक्कल वाटत होता तेव्हा…"


शुभमन गिलला अंपायरने बाद दिल्यानंतर रोहित शर्माने अंपायरशी चर्चा केली आणि नाराजी व्यक्त केली आहे. शुभमन गिलच्या जागी स्टीव्ह स्मिथ असता तर अंपायरने नॉट आऊट म्हणून दिलं असतं, असं टीका रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री करताना दिली आहे. तर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात टीका अंपायर्सवर टीका होताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral Video) होतोय.


पाहा Video



 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने 469 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात 296 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर आता भारतासमोर 443 धावांचे आव्हान आहे. त्यामुळे आता कोण जिंकणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.