Australia vs India: "कोच म्हणून राहुल द्रविड झिरो, देव अक्कल वाटत होता तेव्हा…"

Basit Ali Criticizes Rahul Dravid: ऑस्ट्रेलियाने (Australia vs India) मजबूत लीड घेतली आहे. त्यामुळे आता एकूण लीड ही 400 पार झालीये. अशातच आता टीम इंडियावर चारही बाजूने टीका केली जातीये. अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली (Basit Ali) यांनी थेट भारताचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Updated: Jun 10, 2023, 06:39 PM IST
Australia vs India: "कोच म्हणून राहुल द्रविड झिरो, देव अक्कल वाटत होता तेव्हा…" title=
Basit Ali Criticizes Rahul Dravid WTC Final 2023 Australia vs India

Rahul Dravid, WTC Final  2023: पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारला. त्याला प्रत्युत्तर देताना मात्र टीम इंडियाला 296 धावा करताना नाकीनऊ आलं. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) झुंजार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला फॉलोऑन वाचवता आला. मात्र, ऑस्ट्रेलियाने (Australia vs India) मजबूत लीड घेतली आहे. त्यामुळे आता एकूण लीड ही 400 पार झालीये. अशातच आता टीम इंडियावर चारही बाजूने टीका केली जातीये. अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली (Basit Ali) यांनी थेट भारताचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

काय म्हणाले बासित अली?

देव अक्कल वाटत असताना राहुल द्रविड कुठे डोंगरामागे लपला होते. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड पूर्णपणे झिरो आहेत. मी राहुल द्रविडचा खूप मोठा फॅन आहे, मी आधाही त्यांचा चाहता होतो आणि पुढेही राहणार आहे. द्रविड एक क्लास खेळाडू आहे, एक दिग्गज आहे. मात्र, कोच म्हणून झिरो आहेत, अशी घणघाती टीका बासिल अली यांनी (Basit Ali Criticizes Rahul Dravid) राहुल द्रविडवर केली आहे. भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अशाच विकेट्स होत्या का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

आणखी वाचा - IND vs AUS: जड्डूच्या फिरकीवर नाचला कॅमरून ग्रीन; शेवटी 'तो' मिस्ट्री बॉल टाकला अन् उडवल्या दांड्या, पाहा Video

नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या दोन तासांत भारताने सामना गमावला, असं बासिल अली म्हणाले. भारतीय बॉलर्सची गोलंदाजी पाहिली ती आयपीएलसारखी होती.120 षटकांमध्ये मला फक्त रहाणे, कोहली आणि जडेजा हे खेळाडू तंदुरुस्त दिसले, बाकी खेळाडूंना कसोटी खेळण्याचा अनुभव नाही, असं वाटतंय. बाकी सगळे थकलेले दिसत आहेत, असं म्हणत बासित अली यांनी टीम इंडियावर टीकास्त्र सोडलं आहे.

बॉल टेम्परिंगचा आरोप

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप बासित अली (Basit Ali) यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाने चेंडूशी छेडछाड केली आहे. मात्र,  कोणीही त्याबद्दल बोललं नाही.  15 ते 20 ओव्हरमध्ये चेंडू कधी रिव्हर्स स्विंग होतो, तोही ड्यूक्स बॉल? असा खडा सवाल बासित अली यांनी विचारला आहे. बीसीसीआय (BCCI)  एवढा मोठा बोर्ड असतानाही या गोष्टी पाहू शकत नाहीत का? असा सवाल देखील बासित अली यांनी विचारला आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.