WTC Final पूर्वी शुभमन गिल रोमँटिक डेटवर, `ती` मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? Video तुफान Viral
Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल याचा एक रोमँटिक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shubman Gill Romantic Video : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यात सर्वांचं लक्ष असेल ते शुभमन गिलच्या कामगिरीवर. सध्या उत्तम लयीत असलेला शुभमन टेस्टमध्ये कशी कामगिरी करून दाखवतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मैदानाबाहेर देखील शुभमनची (Shubman Gill) चर्चा होताना दिसते. अभिनेत्री सारा अली खान आणि सारा तेंडुलकर यांच्यासह शुभमनचं नाव जोडलं जातं. आयपीएलच्या फायनलवेळी सारा अली खान हिच्यासोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा देखील रंगली होती. अशातच आता शुभमन गिलचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.
'सारा' जमना गिल का दिवाना, असं फॅन्स म्हणत आहेत, परंतू सध्या सर्वत्र शुभमन गिल आणि सोशल मीडिया स्टारची चर्चा रंगत आहे. अशातच शुभमनचा एक रोमँटिक व्हिडिओ (Romantic Video) तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे आता व्हिडिओमध्ये दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? असा सवाल विचारला जात आहे.
तुम्हाला आठवत असेल तर, शुभमन गिलनं 'स्पायडरमॅन: अक्रॉस स्पायडर-व्हर्स'च्या भारतीय रिमेकला आवाज दिला होता. त्यावेळी शुभमन गिलने याचं प्रमोशन देखील केलं होतं. प्रमोशनच्या वेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निहारिका एनएमसोबत (Niharika NM) तो डेटवर गेला होता. त्याचा व्हिडिओ सध्या ट्रेंड होत आहे. शुभमनने त्यावेळी निहारिका एनएमसह अनेक विषयांवर गप्पा मारल्या. मला सुपरहीरो टाईप सिनेमे आवडतात, असं निहारिका म्हणते.
पाहा Video
निहारिका बोलत असताना मी स्पायडर मॅनचा भारतीय व्हर्जन आहे, असं शुभमन म्हणतो. या दोघांच्या डेटचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यावेळी दोघंही लाजून बोलताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी देखील या फोटोवर लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. त्यावेळी शुभमनने जे काही केलं पाहून निहारिकाची बोलती बंद झाली.