ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video

Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.

Updated: Jun 7, 2023, 12:26 PM IST
ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video title=
WTC 2023 Final Dressing Room Viral Video

WTC Final 2023 IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) चा अंतिम सामना उद्या म्हणजेच 7 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियालाही पहिलं कसोटी विजेतेपद पटकावण्यासाठी जय्यत तयारी करत आहे. 2020 पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2023 Final) सुरू झाली. पहिली फायनल 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमध्ये झाला होती. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करून जेतेपद पटकावलं होतं.

सामन्याला आता काही तास शिल्ल्क असताना आता एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. आयसीसीच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. टीम इंडियाचे दोन स्टार आणि युवा खेळाडू शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्यातील राडा या व्हिडिओमध्ये पहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंची दोस्ती पहाण्याजोगी असते. त्यामुळे दोघेही मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच ड्रेसिंग रूममध्ये ईशान शुभमनला बॅटने फटकावताना दिसतोय. त्यावेळी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) देखील दोघांची मजा घेताना दिसतोय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

गेल्या 10 वर्षांपासून टीम इंडियाने आयसीसी टूर्नामेंट जिंकलेली नाही. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये जिंकली होती. त्यानंतर धोनी, विराट आणि रोहित या तिन्ही कॅप्टनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळली पण ट्रॉफी काही जिंकता आली नाही. टीम इंडियाला 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून (IND vs NZ) पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने फायनल गाठली आहे. त्यामुळे आता रोहितसेनेच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.

आणखी वाचा - WTC Final 2023: एबी डिव्हिलियर्सची मोठी भविष्यवाणी, कोणता संघ जिंकणार? MR.360 म्हणतो...

ओव्हलच्या मैदानावर (The Oval) प्रथमच जूनच्या महिन्यात सामना खेळवला जातोय. ओव्हलच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पूर्वार्धात सामने खेळवले जातात. खेळपट्टी कोरडी आणि फिरकी गोलंदाजांना साजेशी असते. मात्र आता अतिमहत्त्वाच्या सामन्यात पिच फिरकी घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.