Shubman Gill : ...तर शुभमन गिल होणार सस्पेंड; अंपायरविरूद्ध सोशल मीडियावर पोस्ट करणं पडणार महागात
Shubman Gill : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 रन्सने पराभव केला. दरम्यान कॅमरून ग्रीनने शुभमनचा पकडलेला हा कॅच वादाचं कारण ठरला. दरम्यान या कॅचवर खुद्द शुभमन गिलने ( Shubman Gill ) देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.
Shubman Gill : टीम इंडिया ( Team India ) पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी ( ICC Trophy ) जिंकण्यामध्ये अपयशी ठरलीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या दुसऱ्या डावामध्ये ओपनर शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) एका कॅचमुळे मोठा गदारोळ माजलेला दिसला. कॅमरून ग्रीनने शुभमनचा पकडलेला हा कॅच वादाचं कारण ठरला. दरम्यान या कॅचवर खुद्द शुभमन गिलने ( Shubman Gill ) देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. मात्र यामुळे शुभमन गिल सस्पेंड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये शुभमन गिलची विकेट वादाचं कारण ठरलं. स्कॉट बॉलंडच्या गोलंदाजीवर गिल कॅच आऊट झाला. स्लिपमध्ये कॅमरून ग्रीनने ( Cameron Green ) शुभमनचा कॅच पकडताना बॉल जमिनीला लागल्याचं अॅक्शन रिप्लेमध्ये दिसलं. मात्र अंपायरने शुभमनला बाद घोषित केलं आणि सोशल मीडियावर या विकेटबद्दल चांगलीच चर्चा रंगली.
यावेळी काही तज्ज्ञ शुभमन गिलच्या या आऊट करारवर सहमत होते, तर काहींनी हा निर्णय नाकारला. अशामध्ये ऑस्ट्रेलिया टीमचा माजी कर्णधार रिकी पोंटिंग ( Ricky Ponting ) ने याबाबत विधान केलं आहे.
रिकी पॉन्टींगच्या म्हणण्यानुसार, यामुळे शुभमन गिलला ( Shubman Gill ) दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा कदाचित त्याला सस्पेंड देखील केलं जाऊ शकतं. मुळात शुभमनने ( Shubman Gill ) सरळ अंपायरवर प्रहार केला. आणि तुम्ही असं करू शकत नाही.
शुभमनने पंचांवर साधलेला निशाणा
ग्रीनने घेतलेल्या या कॅचमध्ये बॉल टेकल्याचं दिसून आलं होतं. मात्र तरीही शुभमनला आऊट करार देण्यात आला. यावेळी शुभमनसोबत क्रिझवर असलेल्या रोहित शर्माने अंपायरसोबत चर्चा केली. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही शुभमनला तंबूत परतावं लागलं.
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुभमनने ( Shubman Gill ) ग्रीनने घेतलेल्या कॅचचा फोटो त्याच्या ट्विटर हॅन्डलवरुन पोस्ट केला. त्याने हा फोटो पोस्ट करताना एखादी गोष्ट अगदी जवळून किंवा मोठी करुन पाहण्यासाठी वापरला जाणारा मॅग्निफाइंग ग्लास आणि डोक्यावर हात मारतानाचे इमोजी वापरले आहेत. दरम्याने शुभमनचं ( Shubman Gill ) हे कृत्य योग्य नसल्याची टीका करण्यात येतेय.