Rohit Sharma: बंद कर लवकर...; फायनलपूर्वी असं काय घडलं की, सर्वांसमोर संतापला रोहित शर्मा, व्हिडीओ व्हायरल
Rohit Sharma: टीम इंडिया 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार असून सामन्यापूर्वी दोन्ही टीम्सच्या कर्णधारांची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली. या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकाराच्या एक कृत्यावर प्रचंड संतापलेला दिसला. जाणून घेऊया हे प्रकरण काय आहे.
Rohit Sharma: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्रिकेटचा महामुकाबला रंगणार आहे. दुपारी 2 वाजता टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वविजेतेपदासाठी लढत होणार आहे. टीम इंडिया 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार असून सामन्यापूर्वी दोन्ही टीम्सच्या कर्णधारांची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली. या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकाराच्या एक कृत्यावर प्रचंड संतापलेला दिसला. जाणून घेऊया हे प्रकरण काय आहे.
पत्रकारावर संतापला रोहित शर्मा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या वनडे वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकाराचा फोन वाजू लागला. यावेळी रोहित शर्मा काहीसा संतापलेला दिसला.
प्रेस कॉन्फ्रेंसच्या हॉलमध्ये फोन वाजताच रोहित शर्मा चिडतो. यावेळी फोन वाजल्यावर तो रागाने पत्रकाराला फोन स्विच ऑफ करण्यास सांगतो. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाल आहे. या व्हिडिओमध्ये रोहित 'अरे भाई, बंद कर त्याला' असं म्हणताना ऐकू येतो.
यापूर्वी देखील पत्रकारावर संतापला होता रोहित
रोहित शर्माने पत्रकार परिषदेत पत्रकारावर संतापण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही त्याने असं केलं होतं. वर्ल्डकप टीमच्या घोषणेवेळीही तो असाच संतप्त झालेला दिसून आला होता. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितला विचारण्यात आलं की, जेव्हाही भारतीय टीम पाकिस्तानविरुद्ध खराब कामगिरी करतो तेव्हा बाहेरचे वातावरण बिघडतं. यावरून रोहित शर्मा वैतागला होता.
ऑस्ट्रेलियाकडून 2003 चा बदला घेणार का रोहित सेना?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकले आहेत. यावेळी चाहत्यांच्या मनात टीम इंडिया 2003 चा बदला घेणार का हा प्रश्न आहे. तब्बल 12 वर्षांनंतर म्हणजेच 2011 नंतर टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकायचा आहे. टीम इंडियाने 1983 आणि 2011 मध्येच वर्ल्डकप जिंकला आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.