सिकंदर रझाने केली रोनाल्डोची कॉपी, भर पत्रकार परिषदेत असं काही केलं की... पाहा Video
Sikandar Raza removed Coca Cola bottles : झिबॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझा याने बांग्लादेशविरुद्ध सामन्यापूर्वी (BAN vs ZIM) लाईव्ह पत्रकार परिषदेत नेमकं काय केलं? ज्यामुळे त्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
Sikandar Raza press Conference Video : काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्जचा कॅप्टन सिकंदर रझा (Sikandar Raza) याने मोठा निर्णय घेत आयपीएलमधून माघार घेतली होती. झिम्बॉब्वेसाठी खेळण्यासाठी त्याने आयपीएल सोडत असल्याचं सांगितलं होतं. झिम्बॉब्वेचा संघ सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात (BAN vs ZIM) पाच टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे सिकंदर रझा याने राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिलं. मात्र, आता सिकंदर रझा आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भर पत्रकार परिषदेत सिकंदर रझाने सेम टू सेम तेच कृत्य केलं, जसं स्टार फुटबॉलर रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) एका पत्रकार परिषदेत (Press Conference) केलं होतं. नेमकं काय झालं? पाहुया
पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सिकंदर रझा याने पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. सिकंदर रझा जेव्हा झिब्बॉब्वेची जर्सी घालून जेव्हा सिंकदर रझा खुर्चीवर बसला, तेव्हा त्याने समोर असलेली कोको कोलाची बॉटल उचलून खाली ठेवली. त्यावेळी त्याठिकाणी कोको कोला आणि पाण्याची बॉटल देखील ठेवली होती. मात्र, सिकंदर रझाने केवळ कोको कोलाची बॉटल उचलली आणि खाली ठेवली. त्यावेळी पत्रकारांच्या कॅमेऱ्यात त्याची ही कृती कैद झाली. जणू काही सिकंदर रझाने लोकांना कोको कोला ऐवजी पाणी पिण्याचा सल्ला दिलाय.
पाहा VIDEO
दरम्यान, 2021 मध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने यानेही पत्रकार परिषदेदरम्यान अशाच पद्धतीने टेबलवरून कोका-कोलाच्या बॉटल काढून ठेवली होती. त्यानंतर कंपनीचे मोठं नुकसान झालं होतं. आता रोनाल्डो प्रमाणे सिकंदरवर देखील प्रोमोटर्सकडून कारवाईची मागणी होणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
बांग्लादेशचा संघ : नजमुल हुसैन शंटो (कॅप्टन), लिट्टन दास, तंजीद हसन तमीम, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह, अनिक, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, जेकर अली, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, परवेज हुसैन इमोन, तनवीर इस्लाम, अफीफ हुसैन आणि शैफ उद्दीन.
झिम्बॉब्वेचा संघ : सिकंदर रज़ा (कॅप्टन), फ़राज़ अकरम, ब्रायन बेनेट, रयान बर्ल, जॉनाथन कैंपबेल, क्रेग एर्विन, जॉयलॉर्ड गम्बी (विकेटकीपर), ल्यूक जोंगवे, क्लाइव मडांडे (विकेटकीपर), तदिवानाशे मुरुमानी, वेलिंगटन मसाकाद्ज़ा, ब्लेसिंग मुज़राबानी, आइंस्ले एनडलोवु, रिचर्ड एनगार्वा आणि शॉन विलियम्स.