Sikandar Sheikh: सोलापूर जिल्ह्यातील (Solapur News) मोहोळ (Mohol) येथील महाराष्ट्र केसरीच्या (Maharastra Kesari) उपांत्य फेरीत झालेल्या कुस्तीमुळे सिकंदर शेख (Sikandar Sheikh) राज्यात प्रसिद्ध झाला. उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागल्याने सिकंदरच्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, सिकंदरने चाहत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा आपली दमदार कामगिरी दाखवून दिली. सोलापुरातील प्रसिद्ध भीमा केसरी (Bhim Kesari) स्पर्धेत पंजाबचा भुपेंद्र पैलवानाला चारी मुंड्या चीत केलंय. (sikandar sheikh expressed his belief that will bring maharashtra kesari in 2024m solapur mohol marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पैलवान महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांनी पैलवान सिकंदर शेख याचा पराभव केला होता. सिकंदर शेख यांच्या पराभवाची सोशल माध्यमातून वेगळी चर्चा रंगली होती. त्यानंतर सिकंदर शेखने सांगली, सातारा आणि मोहोळ येथील भीमा केसरी गदा जिंकून मैदान गाजवलं. मोहोळ शहरात सिकंदर शेख यांची वाजत गाजत रॅली काढण्यात आली. 


मोहोळ शहरातील (Mohol) छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. जिप्सीमध्ये बसून सिकंदर यांची रॅली (Sikandar Sheikh Rally) मोहोळ शहरातून काढण्यात आली. यावेळी मोहोळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी सिकंदरने एल्गार केलाय. 2023 ची गदा जरी नाही मिळाली तरी 2024 ला मात्र महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणार, असा विश्वास सिकंदरने यावेळी व्यक्त केला आहे.


आणखी वाचा - Sikandar Sheikh : हाच तो क्षण ज्या डावामुळे सिकंदर हरला, पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ!


दरम्यान, सिकंदरने भुपेंद्र अजनाला अस्मान दाखवलं. त्यामुळे सिकंदरच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सिकंदरची ज्यावेळी रॅली काढण्यात आली, त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी जमली होती. सिकंदरच्या नावाचा जयजयकार सुरू होता. ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सिकंदर शेखने सुध्दा नागरी सत्कारानंतर ग्रामस्थांचे आभार मानले. मला यश मिळालंय, पण अजून खूप काम करायचंय. एवढ्यावर थांबून चालणार नाही, असंही तो यावेळी आत्मविश्वासाने म्हणत होता.