Maharashtra Kesari 2023 :  फक्त 10 सेकंदात शिवराज राक्षे चितपट झाला आहे. सिकंदर शेखने (sikandar sheikh)  महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari Kusti 2023)  गदा जिंकली आहे. पुणे जिल्ह्याच्या फुलगाव येथे महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिकंदर शेख आणि गतवर्षीचा विजेता शिवराज राक्षे याच्यांत फायनल सामना रंगला. सिकंदर शेख याने अवघ्या दहा सेकंदात शिवराज राक्षे याला चितपट करत महाराष्ट्र केसरी ची गदा आणि महिद्रा थार कार पटकवली. 
यावेळी बोलताना सिकंदर शेख यांनी गतवर्षीचा खरा विजेता मीच होतो असं सांगत यावर्षी मी गेली सहा सात महिने पुर्ण तयारी करून महाराष्ट्र केसरी चा मान मिळवला असे म्हंटले आहे.याचं खरं श्रेय माझे वडील आणि कोच यांना जातं असं सांगत,मागील वर्षी वाद खोटा उठवला होता आणि मागच्या वर्षी देखील खरा विजेता मीच होतो सांगत माझं पुढच ध्येय हे खुप मोठं आहे असं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने सांगितले. 


कोण आहे सिकंदर शेख?


सिकंदरचे (sikandar sheikh)वडिल रशिद शेख हे देखील एक पैलवान होते. तालमीत सरावाला असतानात तालमीची स्वच्छता करायचे आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचे. असं सर्व सुरू असताना अचानक वडिलांची प्रकृती अचानच बिघडली. त्यामुळे त्यांनी लग्नगाठ बांधली. आणि पुढे जाऊन त्यांना हूसेन आणि सिकंदर (sikandar sheikh) ही दोन मुले झाली. मात्र नंतर कुस्तीतील मिळणाऱ्या बक्षीसाच्या रक्कमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले होते.त्यामुळे मग त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायचे आणि नंतर उरलेल्या वेळात लहान मुलाला घेऊन आखाड्यात जायचे. सिकंदरच्या (sikandar sheikh)वडिलांना आजारपणाने गाठले आणि त्यांची हमाली सुटली. त्यामुळे खुराकाला लागणाऱ्या पैशाची चणचण भासू लागली होती. त्यामुळे या समस्येवर पर्याय म्हणून हूसेनने बापाच्या हमालीचे ओझे आपल्या पाठिवर घेतले. आणि सिकंदरने वडिलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवायला सुरूवात केली. वस्ताद विश्वास हारगले याच्या मार्गदर्शनात तो कुस्तीचे धडे शिकू लागला.  सिकंदरच्या (sikandar sheikh)वडिलांना आजारपणाने गाठले आणि त्यांची हमाली सुटली. त्यामुळे खुराकाला लागणाऱ्या पैशाची चणचण भासू लागली होती. त्यामुळे या समस्येवर पर्याय म्हणून हूसेनने बापाच्या हमालीचे ओझे आपल्या पाठिवर घेतले. आणि सिकंदरने वडिलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवायला सुरूवात केली. वस्ताद विश्वास हारगले याच्या मार्गदर्शनात तो कुस्तीचे धडे शिकू लागला.