Sikander Sheikh : महाराष्ट्र केसरीत सिकंदर शेखवरून (Sikander Sheikh) सूरू झालेला वाद शमता शमत नाही आहे. या वादात रोज भर पडताना दिसत आहे. हा वाद सुरु असतानाच सिंकदर शेखने आता 'विसापूर केसरी'ची (visapur kesari) गदा पटकावली आहे. महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) स्पर्धा त्याची थोडक्यासाठी हुकली होती. त्यामुळे असंख्य कुस्ती प्रेमींची निराशा झाली होती. आता त्याने 'विसापूर केसरी'चे मैदान मारून कुस्ती प्रेमींना दिलासा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesari) प्रमुख दावेदार मानल्या जाणाऱ्या सिंकदर शेखने सांगलीतील विसापूर केसरी स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत देशभरातून अनेक पैलवान दाखल झाले होते.या पैलवानासोबत सिंकदर शेखची कुस्ती रंगली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करून सिंकदर शेखने अंतिम फेरी गाठली होती. या अंतिम फेरीत त्याने पंजाबच्या पैलवानाला लोळवून 'विसापूर केसरी' (visapur kesari) स्पर्धेचे मैदान मारले होते. 


अशी रंगली अंतिम लढत 


विसापूर केसरी (visapur kesari) स्पर्धेच्या अंतिम लढतीत सिकंदर शेख विरूद्ध पंजाबचा पैलवान नवजीत सिंह यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सिकंदर शेखने (Sikander Sheikh) पाच मिनिटात नवजीत सिंहला चितपट केले होते. आणि विसापूर केसरीचे गदा पटकावली होती. सिकंदर शेखच्या या विजयानंतर कुस्ती प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 


नेमका वाद काय? 


महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari)स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती. या लढतीत महेंद्रने मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नसतानात त्याला चार गुण दिले होते. या चार गुणानंतर सिकंदर शेखचा अंतिम लढतीत पराभव झाला होता. या चार गुणावर स्वत: सिंकदर शेखने (Sikander Sheikh)सुद्धा आक्षेप झाला होता. तसेच सोशल मीडियावर आणि कु्स्ती शौकींनांमध्ये सिकंदरवर अन्याय झाल्याचा सुर होता. या वादावर अद्याप पडदा पडू शकलेला नाही आहे. 


दरम्यान हा वाद सुरू असताना सिकंदर शेखने (Sikander Sheikh)पुन्हा मैदानातून विसापूर केसरी गदा पटकावली आहे. त्याच्या या विजयानंतर कुस्तीप्रेमी आनंदी झाले आहेत.