नवी दिल्ली : सुप्रसिद्ध टेनिस स्टार सेरेना विल्यमबाबत एका अमेरिकन गायकाने खळबळजनक दावा केला आहे. टेनिसपटू सेरेना आणी मी रिलेशनमध्ये होते, असा दावा या गायकाने केला आहे.


तिच्यात आणि माझ्यात झाले शरीरसंबंध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीन किंगस्टन असे या गायकाचे नाव असून, बीबीसी रेडियो वनला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हा खळबळजनक दावा केला आहे. रिडिओला मुलाखत देताना त्याने सांगितले की, सेरेना ही नंबर वन टेनिसपटू आहे. तिच्यासोबत माझे शारीरिक संबंधही झाले आहेत. मुलाखती दरम्यानत त्याने केलेल्या धक्कादायक दाव्यानतर एकच खळबळ उडाली आहे.


अभिनेत्री लॉरेनसोबत करेन लग्न


मुलाखतीदरम्यान, कोणासोबत लग्न करायला आवडेल असे, सीनला विचारले असता, आपल्याला अभिनेत्री लॉरेन लंडनचे नाव त्याने घेतले. पाश्चात्य कल्चरला अनुसरून जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तुला कोणासोबत झोपायला आवडेल तर, त्याने अभिनेत्री मगन गुडचे नाव बिनदिक्कतपणे घेतले. या उत्तरानंतर त्या विचारण्यात आले की, या आधी तुझे कोणासोबत शरीरसंबंध झालेत का, त्यावर त्याने सेरेना विल्यमचे नाव घेतले. तसेच, आपण काही काळ रिलेशनमध्ये होतो. तिच्याशी आपले शरीरसंबंध झाले असल्याचे त्याने सांगितले.


मुलाखत घेणाराही झाला अवाक


सेरेना विल्यम सोबत आपले शरीरसंबंध झाल्याचे सीनने सांगताच मुलाखत घेणाराही अवाक झाला. त्याची ही स्थिती पाहून सीन म्हणाला, माझी आणि सेरेनाची भेट काही वर्षांपूर्वीच झाली आहे. 2011मध्ये आम्ही काही दिवसांसाठी एकत्रही राहिलो. तसेच, मी स्वत:ही सेरेनासारखी दोस्त मिळावी अशी इच्छा ठेवत होतो असेही, सीनने सांगितले.