मुंबई : भारतात प्रचंड गुणवत्ता असलेली मुले आहेत. आयपीएलमध्येच असे अनेक गुणवत्तापूर्ण खेळाडू पाहायला मिळाले. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. मुलगा मोठा असो वा लहान भारतात क्रिकेटची आवड नसलेला विरळच. क्रिकेटवर बोलायचे असल्यास वा खेळायचे असल्यास प्रत्येकजण तयार असतो. गल्लीबोळात क्रिकेट हाच गेम सर्वाधिक खेळला जातोय. भारताला फलंदाजांचा देश म्हटले जाते. भारताने क्रिकेटमध्ये एकाहून एक सरस फलंदाज दिलेत. फलंदाजांच्या रेकॉर्डमध्ये भारतच अव्वल असेल. एकेकाळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या तिकडीने क्रिकेट विश्वात धमाल केली होती. सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. याची फलंदाजी पाहून लोकांना सौरव गांगुलीची आठवण झाली. या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी याची फलंदाजी सौरव गांगुलीची आठवण करुन देणारी असल्याची प्रतिक्रिया दिलीये. या छोट्याला लोकांनी लिटिल दादा असे नावही दिलेय.