दणक्यात मॅच जिंकवली पण, प्रेक्षकांची गर्दी पाहून झाली भावूक; Smriti Mandhana म्हणते...!
5 सामन्यांच्या टी-20 सिरीजचा हा दुसरा सामना होता आणि सिरीज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. कालचा हा सामना इतका रंजक झाला की चाहत्यांना रिझल्टसाठी सुपर ओव्हर होण्याची वाट पहावी लागली.
Smriti Mandhana Gets Emotional : मुंबईच्या डी.वाय पाटील स्टेडियमवर रविवारी 11 डिसेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेटर्सचा (Team India Womens) सामना रंगला होता. महिलांच्या टीम इंडियाने अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Indian women's team beat Australia) पराभव केला. 5 सामन्यांच्या टी-20 सिरीजचा हा दुसरा सामना होता आणि सिरीज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. कालचा हा सामना इतका रंजक झाला की चाहत्यांना रिझल्टसाठी सुपर ओव्हर होण्याची वाट पहावी लागली.
कालच्या या सामन्याच चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दरम्यान स्टेडियममध्ये चाहत्यांची इतकी गर्दी पाहून टीम इंडियाची खेळाडू Smriti Mandhana भावूक झाली आणि तिने चाहत्यांना खास मेसेज दिला आहे.
Smriti Mandhana ने मानले चाहत्यांचे आभार
भारतात आता पुरुषांच्या क्रिकेटनंतर महिलांचं क्रिकेट देखील मोठ्या संख्येने पाहिलं जातं. भारतीय महिला टीमने क्रिकेटप्रेमींच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ज्यामुळे चाहते आता त्यांचे सामने पाहण्यासाठी थेट स्डेडियममध्ये पोहोचू लागले आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात 45 हजार प्रेक्षक पोहोचले होते.
सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांची संख्या पाहता टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृति मंधानाने त्यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय, ज्यामध्ये ती सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे आभार मानतेय.
या व्हिडीओमध्ये Smriti म्हणते, प्लीज सामना पहायला येत राहा, आम्ही प्रयत्न करू की, तुम्हाला अधिकाधिक आनंद मिळेल.
दुसऱ्या टी-20 मध्ये असा रंगला सुपर ओव्हरचा थरार
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसऱ्या टी-20 सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळाला. भारताने सुपर ओव्हरमध्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. सुपर ओव्हरमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 20 रन्स केले. ऋचा घोषने सुपर ओव्हरच्या सुरुवातील सिक्स मारली आणि दुसऱ्याच बॉलला तिची विकेट गेली.
यानंतर हरमनप्रीत कौर मैदानात उतरली आणि तिने एक रन घेतला. चौथ्या बॉलवर स्मृती मानधनाने फोर मारली आणि पाचव्या बॉलवर तिने सिक्स मारली. तर शेवटच्या बॉलवर मानधना आणि हरमनप्रीतने 3 रन्स काढले. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 21 रन्सची गरज होती, मात्र महिला 16 रन्सचं करू शकल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज रेणूका ठाकूर हिने उत्तम गोलंदाजी केली