नवी दिल्ली : सुप्रसिद्ध फूटवेअर आणि एक्सेसरीज कंपनी बाटाने महिला क्रिकेट टीममधील खेळाडू स्मृती मंधाना हिला आपल्या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स वेअर सब ब्रॅंड पावरचे ब्रॅंड अॅम्बेसेटर बनवले आहे. स्मृती मंधानाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकवले. पावर बाटा ही आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स वेअर ब्रॅंड असून ते १९७१ मध्ये लॉन्च करण्यात आले आहे.


करार केल्यानंतर स्मृती म्हणाली....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाटासोबत करार केल्यानंतर स्मृती म्हणाली की, या ब्रॅंडचा उद्देश अधिकाधिक भारतीय तरुणांना फिटनेसच्या मार्गावर आणण्यास सक्षम करण्याचा आहे. त्यामुळे या ब्रॅँडसोबत जोडताना मला आनंद होत आहे. पावर सारख्या कंपनीचे ब्रॅँड अॅम्बेसेटर होणे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे. कारण हे माझ्या वैयक्तिक स्टाईल आणि मुल्यांचे प्रदर्शन करते. 


स्मृतीला ब्रॅँड अॅम्बेसेटर करुन खूप उत्साहीत


बाटा इंडियाचे कंट्री मॅनेजर संदीप कटारिया यांनी सांगितले की, स्मृती सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रतिभाशाली ठरेल. क्रिडा विश्वातील ती एक अत्यंत खंबीर रोल मॉडल आहे. आम्ही देशाचा मान वाढवणाऱ्या स्मृतीला ब्रॅँड अॅम्बेसेटर करुन खूप उत्साहीत आहे.


स्मृतीची शतके


स्मृतीने आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात शतक झळकवले. यामुळे अशी कामगिरी करणारी भारतीय क्रिकेट महिला संघातील ती एकटी खेळाडू आहे. आफ्रिकेशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही तिने शतक ठोकले होते.