VIDEO : Imane Khelif चा संपूर्ण लुक बदलला, नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!
Algeria Boxer Imane Khalif : पॅरिस ऑलिम्पिकमधील तुम्हाला ती बॉक्सर आठवते का? जिच्यासमोर जायला चांगल्या चांगल्या खेळाडूंना भीती वाटायची. कोणी म्हणाले, ती Transgender आहे, तर कोणी तिला पुरुष म्हणत होतं. या वादाच्या भोवऱ्यात अकडलेली या बॉक्सरने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तिचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झालंय.
Algeria Boxer Imane Khalif New Look Video : पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये यंदा अनेक वाद आणि अनेक गोष्टींमुळे गाजले. त्यातील सर्वात चर्चेत राहिला तो अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफ हिचा वाद. ती जेव्हा बॉक्सिंग रिंगमध्ये यायची तेव्हा प्रतिस्पर्धे घाबरत होते. कोणी म्हटलं ती पुरुष आहे तर कोणी तिला Transgender म्हटलं. पण तिने हार मानली नाही. लिंग विवादात अडकूनही तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल. इमानने 66 किलो वजनी गटात चीनची प्रतिस्पर्धी यांग लिऊ हिला हरवून सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानंतही त्याच्यावर चौहूबाजूने टीका होतेय. अशातच तिचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा लूक पूर्णपणे (Imane Khelif Glam Makeover) बदलेला आहे. तो पाहून नेटकरी थक्कं झालंय.
तू आहेस तरी कोण?
पॅरिस ऑलिम्पिकमधील एका सामन्यात इटालियन बॉक्सर अँजेला कारिनीने 46 सेकंदांनंतर सामना सोडल्यानंतर हा वाद सुरू झाला. इमान खलिफेला तिच्या लिंग चाचणीबद्दल अपमानास्पद टिप्पण्यांसह सोशल मीडियावर ट्रान्सफोबिक टीकेचा सामना करावा लागला. बऱ्याच लोकांनी सांगितलं की इमान 'पुरुषासारखी दिसते' आणि वादात भर पडली.
हेसुद्धा वाचा - Vinesh Phogat ला खरंच मिळाले 16 कोटींचं बक्षीस? पती म्हणाला की, 'हे एक साधन...'
टीकाकारांना व्हिडीओतून दिलं सडेतोड उत्तर
आता इमान खलीफने एक मेकओव्हर व्हिडीओ शेअर करून ट्रोल्सला प्रत्युत्तर दिलंय. ज्यामध्ये ती एका सुंदर महिलेच्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये, इमिनची हेअर स्टाइल बदलून चीकी ब्लो ड्राय करण्यात आली आहे. तिचा हा बदलेला लूक पाहून नेटकरांना धक्का बसलाय. इमिनने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. आतापर्यंत त्याला 20 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळालेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर कंमेट बॉक्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काही यूजर्सने इमान खलीफच्या नवीन लूकबद्दल वादग्रस्त टीका केली. जसे की 'हा फक्त एक मेकअप करणारा माणूस आहे' आणि 'आयलाइनर घालणारा माणूस आहे.'
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर इमान भावूक झाली आणि म्हणाली 'मला संपूर्ण जगाला सांगायचंय की मी एक महिला आहे आणि मी नेहमीच महिलाच राहीन.' तिने त्याच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एलोन मस्क आणि जेके रोलिंग यांच्यासह ऑनलाइन द्वेष करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केलीय.