`कधी कधी आपल्या डोक्यांमधील विचार....`, कर्णधारपद हुकल्यानंतर हार्दिक पांड्या थेट बोलला, `कधीतरी मन...`
बीसीसीआयने टी20 सिरीजसाठी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची निवड केली. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या किंवा शुभमन गिल यांच्या नावाची चर्चा होती. पण उपकर्णधारपद शुभमन गिलकडे गेलं आहे. यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
बीसीसीआयने टी20 सिरीजसाठी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) निवड केली. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या किंवा शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या नावाची चर्चा होती. पण उपकर्णधारपद शुभमन गिलकडे गेलं आहे. यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 18 जुलैला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची (India Squad for Sri Lanka Tour 2024) घोषणा करण्यात आली. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. तर रोहित शर्मा वनडे मालिकेचे नेतृत्व करणार आहे. तर या दोन्ही मालिकेसाठी शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. (Sometimes the thoughts in our heads Hardik Pandya spoke directly after losing the captaincy Sometimes the mind)
टी-20 कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्याचे नाव आघाडीवर होतं. पण त्याला कर्णधारपद काय उपकर्णधारपदही देण्यात आलं नाही. खरं तर हार्दिक पांड्यासाठी 18 जुलै ही तारखी आयुष्यभरासाठी महत्त्वाची ठरली. कारण यादिवशी त्याचं कर्णधार पदाच स्वप्न धुळीस मिळालं तर दुसरीकडे त्याने नताशासोबत घटस्फोटाची माहितीही सोशल मीडियावर जाहीर केली. त्यानंतर तो पहिल्यांदाच मीडिया समोर आल्या.
हार्दिक पांड्याला सध्या मैदानात आणि पर्सनल आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करतोय. त्याच्या 'स्पोर्ट्स ॲपेरल ब्रँड' लाँचच्या निमित्ताने त्याने आपल्या सर्व भावना आणि फिटनेसवर लांबलचक संवाद साधला. पांड्या म्हणाला, 'जेव्हा आपलं शरीर थकत नाही, तेव्हा आपलं मन थकतं. त्यामुळे आयुष्यात असे प्रसंग आले जेव्हा मी माझ्या मर्यादा ढकलण्यात सक्षम होतो. हे तेव्हाच घडलं जेव्हा माझं मन थकलं पण मी माझ्या शरीराला पुढे जाण्यास सांगत राहिलो. जर तुम्ही आणि मी प्रत्येकी 20 प्रयत्न केलं तर दोघांमध्ये काही फरक नाही, मात्र जर मी 25 प्रयत्न केलं आणि स्वतःला आव्हान दिलं, तर पुढच्या वेळी मी 25 प्रयत्न करेन, आणि त्याच्या पुढच्या वेळी मी 30 प्रयत्न करेन.'
हेसुद्धा वाचा - Hardik Pandya Divorce : हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाला 'ही' सुंदरी ठरली कारण? काय आहे दोघांमध्ये कनेक्शन?
30 वर्षीय पांड्या म्हणाला, 'कधीकधी विचारांशिवाय मन स्थिर ठेवणे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा माझा ट्रेनर मला 10 पुश अप करायला सांगतो तेव्हा मी नेहमी 15 पुश अप करतो. यामुळे माझा स्टॅमिना वाढला आहे आणि मला वाटते की फिटनेसचा प्रवास सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.'