Hardik Pandya Divorce : हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाला 'ही' सुंदरी ठरली कारण? काय आहे दोघांमध्ये कनेक्शन?

Hardik Natasa Divorce :  हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाला एक मॉडेल जबाबदार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कोण आहे ही तरुणी आणि तिचं हार्दिकशी काय कनेक्शन आहे?

नेहा चौधरी | Updated: Jul 21, 2024, 01:07 PM IST
Hardik Pandya Divorce : हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाला 'ही' सुंदरी ठरली कारण? काय आहे दोघांमध्ये कनेक्शन? title=
Hardik Natasa Divorce was caused by hardik pandya and russian model elena tuteja dating rumours

Hardik Natasa Divorce : आयपीएल 2024 ची रंगत सुरु असताना अचानक हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्याम घटस्फोटाची बातमी समोर आली होती. पण या दोघींपैकी कोणीही यावर भाष्य केलं नाही. आयपीएल 2024 चा थरार संपला त्यानंतर T20 वर्ल्ड कप झालं. त्यात हार्दिकने मैदान गाजवलं आणि भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. पण या सगळ्या आनंदात नताशा कुठे दिसली नाही. 

अखेर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नानंतर 18 जुलैला अखेर हार्दिक आणि नताशा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांनी आपण सांमजस्याने घटस्फोट घेत असल्याचा जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. खास करुन या दोघांचा घटस्फोट का झाला याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहेत. (Hardik Natasa Divorce was caused by hardik pandya and russian model elena tuteja dating rumours)

सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यामधील घटस्फोटाचं कारण एका सुंदर मॉडेलला जबाबदार ठरवलंय. कोण आहे ही सुंदरी (Hardik Pandya And Russian Model) आणि हार्दिकचं तिच्याशी काय कनेक्शन याबद्दल जाणून घ्या. 

कोण आहे ही मॉडेल?

हार्दिकचं घटस्फोट रशियाची मॉडेल अलिना टुटेजा हिचामुळे झाल असेल असा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे. अलिना ही मिसेस इंडिया स्पर्धेत तिसरी आली होती. तिने सावधान इंडिया, पार्टनर्स या सिरियलमध्ये काम केलंय. तिने टी20 वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर तिच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक पांड्यासोबतचे फोटो टाकले. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहेत. 

खऱं तर हे फोटो एका जाहिरातील आहे. हार्दिक आणि अलिना या दोघांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलंय. त्या वेळेचे हे फोटो असून अलिनाने हार्दिकसाठी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली होती. ज्यात तिने लिहिलं होतं की, 'भारताला आपल्या चॅम्पियन्सचा अभिमान वाटत आहे. या एका चॅम्पियन खेळाडूबरोबरचे काही फोटो शेअर करावेसे वाटले.'

भारतीय संघासह हार्दिक पंड्याचा सर्वांनाच अभिमान आहे.' अलिना आणि हार्दिक फक्त एका जाहीरातीसाठी एकत्र आले होते. त्यानंतर चाहत्यांनी मात्र त्यांचे अफेअर सुरु असल्याचे म्हटले आणि हार्दिकच्या घटस्फोटालाही तीच जबाबदार असल्याचे तर्क लावले आहेत.