Sourav Ganguly : `बीसीसीआयचं काय चुकलं?`, श्रेयस अन् इशानला धडा शिकवल्यावर दादाने चांगलंच झापलं, म्हणतो...
Sourav Ganguly On BCCI Central Contract : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने श्रेयस आणि इशान किशनवर सडकून टीका केली आहे.
Sourav Ganguly Statement : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज इशान किशनने (Ishan kishan) दक्षिण आफ्रिकेचा दौरा मध्यावर सोडला आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही तो खेळला नाही. तर श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झाल्यानंतर देखील तो रणजीसाठी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) दोन्ही खेळाडूंना वार्षिक करारारून वगळलं. अशातच टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) श्रेयस आणि इशान किशनवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणतो सौरव गांगुली?
रोहित शर्मा एक विलक्षण कर्णधार आहे, त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ज्याप्रकारे भारताचं नेतृत्व केलं, विश्वचषकात त्याने ज्याप्रकारे नेतृत्व केले ते आश्चर्यकारक होतं. तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. त्यावेळी त्याने बीसीसीआयच्या निर्णयावर मनमोकळं उत्तर दिलं. इशान आणि अय्यर यांच्याबाबत बीसीसीआयने घेतलेले निर्णय योग्यच होता. करारबद्ध खेळाडूंनी नक्कीच देशांतर्गत क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळाडूंनी खेळावं, अशी बीसीसीआयची इच्छा आहे, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
श्रेयस आणि इशान या दोन्ही खेळाडूंनी रणजीच्या प्रमुख स्पर्धेत खेळण्यास नकार दिला, याचं मला आश्चर्य वाटलं, असंही दादाने म्हटलं आहे. दोघांनीही चुकी केली. श्रेयस अय्यर काही दिवसांत उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळणार आहे, असंही गांगुलीने म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही प्रतिभावान खेळाडू असेल तर भारताकडून सर्व फॉरमॅट खेळलं पाहिजे. तुम्ही नियमांचं पालन करत नसाल तर बीसीसीआयचं काय चुकलं? असा सवाल सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
पाचव्या सामन्यासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.