Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयानंतर विराटने या दौऱ्यात कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता. त्यावर आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) मोठा खुलासा केला आहे.


काय म्हणाला Saurav Ganguly?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवलं नाही. मी यापूर्वीही अनेकदा असं म्हटलं आहे. त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचं नेतृत्व करायचं नव्हतं. या निर्णयानंतर मी त्याला सांगितलं की जर तुम्हाला टी-20 मध्ये कर्णधार रहायचं नसेल तर तुम्ही व्हाईट बॉल क्रिकेटचं कर्णधारपद पूर्णपणे सोडून दिलेलं बरं होईल. दोन्ही क्रिकेटमध्ये एक एक कॅप्टन असावा, असं मी त्याला सांगितलं होतं, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.


वनडे क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, असं विराट कोहली याने म्हटलं होतं. मात्र, सौरव गांगुली आणि विराट यांच्या छुपं युद्ध सुरू असल्याचं पहायला मिळत होतं. त्यावर आता गांगुलीने खुलासा केला आहे. कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्याचा बीसीसीआयचा निर्णय अचानक होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडीच्या अवघ्या 90 मिनिटांपूर्वी त्याला या निर्णयाची माहिती देण्यात आली होती, असा खुलासा देखील विराटने केला होता.


आणखी वाचा - टीम इंडियामध्ये कधी खेळणार हार्दिक पांड्या? BCCI चा मेगा प्लॅन तयार!


दरम्यान, बीसीसीआय पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी कोहलीला आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, अखेर विराटला कर्णधारपद सोडावं लागलं, असा खुलासा निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केला होता. कोहलीला टार्गेट केलं होतं, असा एकंदरीत संदेश दिला जात होता, असंही चेतन शर्मा यांनी म्हटलं होतं.