मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गांगुली त्यांच्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेत. दरम्यान सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल टीम आशियाई चषक 2023 साठी पात्र ठरलीये. यासंदर्भात गांगुली यांनी कर्णधार सुनील छेत्रीचे अभिनंदन करणारे ट्विट केलं आहे. ज्यामध्ये सौरव गांगुलीने मोठी चूक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी आशियाई चषक 2023 साठी पात्र ठरल्याबद्दल सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचं कौतुक केले. यावेळी गांगुली यांनी ट्विट करत म्हटलं की, "भारतीय फुटबॉल टीमने 2023 AFC आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी केलीये. कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली टीमने चांगली कामगिरी केली आणि चाहत्यांच्या मोठ्या पाठिंबा टीमला मिळाला."



सौरव गांगुली यांनी ट्विट करताना चुकीच्या व्यक्तीला टॅग केलं. त्यांची ही चूक एका नेपाळी चाहत्याने लक्षात आणून दिली. नेपाळी चाहत्याने याला रिप्लाय देताना तो म्हणाला, 'हाय सौरव, मी नेपाळचा सुनील आहे. मी तुमचा कर्णधार सुनील छेत्री नाही. कृपया तुमचं ट्विट चेक करा.'



त्यानंतर रात्री 8 वाजता गांगुलीला जुने ट्विट डिलीट करून नवीन ट्विट करावं लागलं. छेत्रीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पॅलेस्टाईनचा 4-0 असा पराभव करून आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. आता टीम इंडियाला आशियाई चषकाच्या क्वालिफायर सामन्यात हाँगकाँगचा सामना करावा लागणार आहे.