Sourav Ganguly Statement : टीम इंडिया येत्या जुलै महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी टेस्ट टीमच्या उप कर्णधार पदाची धुरा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane ) देण्यात आली आहे. उप कर्णधारपदाची भूमिका साकारणं अजिंक्यसाठी काही नवी गोष्ट नाही. दरम्यान अजिंक्यला पुन्हा एकदा उपकर्णधार बनवल्याने बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) यांनी टीका केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) खांद्यावर पुन्हा एकदा उप कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर गांगुली यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या या निर्णयावर सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) नाराज आहेत. गांगुली यांच्या म्हणण्याप्रमाणे, 18 महिने टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या खेळाडूला अचानक भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार म्हणून बीसीसीआयने ( BCCI ) कसं निवडलं?


बीसीसीआयच्या निर्णयावर रहाणे नाराज


अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) दीड वर्षांपासून भारतीय टेस्ट टीममधून बाहेर होता. 2021 मध्ये भारतीय टेस्ट टीमचं उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडून काढून घेण्यात आलं होतं. दरम्यान त्यावेळी सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष होते. 


बीसीसीआयवर निशाणा साधताना गांगुली ( Sourav Ganguly ) म्हणाले की, 'तुम्ही 18 महिने टीम इंडियातून बाहेर राहता, त्यानंतर अचानक परतल्यावर टेस्ट सामना खेळल्यानंतरच तुम्हाला भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार बनवलं जातं. या निर्णयामागचे कारण मला अजिबात समजलेलं नाही. 


गांगुली ( Sourav Ganguly ) पुढे म्हणाले की, उपकर्णधार म्हणून अजूनही काही पर्याय होते. दीर्घकाळापासून टेस्ट क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेल्या रवींद्र जडेजाचा पर्याय टीम इंडियाकडे होता. पण परतल्यानंतर लगेचच त्याला उपकर्णधार बनवणं, हे मला अजून काही समजलं नाही. 


वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीम इंडियाची निवड


रोहित शर्मा ( कर्णधार ), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार ), केएस भरत ( विकेटकीपर ), इशान किशन ( विकेटकीपर ), आर अश्विन, आर जडेजा,  मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल