Jay Shah On Ganguly : गांगुलींचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा? जय शाह म्हणाले...
बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Bcci Chief Sourav Ganguly) याने केलेल्या एका ट्विटमुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Bcci Chief Sourav Ganguly) याने केलेल्या एका ट्विटमुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. गांगुलीने ट्विट करत नव्या इनिंगला लवकरच सुरुवात करणार असल्याचं म्हटलं. पण गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं अनेकांचा गैरसमज झाला. अखेर या सर्व प्रकरणी बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (sourav ganguly has not step down bcci chief post bcci chief jay shah denided about rumors)
जय शाह काय म्हणाले?
"गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याच्या अफवा चुकीच्या आहेत", अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी एएनआयला दिली आहे. बीसीसीआय सचिव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अखेर अनेकांना झालेला गैरसमज दूर झाला आहे.
गांगुलीच्या ट्विटमध्ये काय?
माझ्यासाठी 2022 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. मी क्रिकेट कारकिर्दीला 1992 मध्ये सुरुवात केली. आता मला करिअर सुरु करुन 30 वर्ष झाली आहेत. या 30 वर्षांच्या मोठ्या प्रवासात अनेकांचं सहकार्य लाभलं. क्रिकेटमुळे मला खूप काही मिळालं. आतापर्यंत ज्यांनी मला मदत केली मी त्या सर्वांचा आभारी आहे. आता लवकरच नव्या इनिंग्चा श्रीगणेशा करतोय. तुमच्या सर्वंचा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे", असं गांगुलीने ट्विटमध्ये म्हटलंय.