सौरव गांगुलीने `या` खेळाडूचं सांगितल भविष्य, आता टीम इंडियात करणार जागा
या खेळाडूबद्दल केलं वक्तव्य
मुंबई : हैदराबादच्या विरूद्ध आयपीएल 2018 मध्ये नाबाद शतक करणारा ऋषभ पंतच्या खेळावर भारताचा माजी कॅप्टन सौरव गागुंली खूष झाला आहे. दिल्लीच्या विकेटकीप फलंदाजाला योग्य वेळी टीम इंडियात खेळण्याची संधी मिळेल. ऋषभ पंतने टूर्नामेंटमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाजी केली होते. पंतने 63 बॉलमध्ये नाबाद 128 धावा केल्या आहेत. आणि हा भारतीय खेळाडूचा टी 20 मधील सर्वश्रेष्ठ स्कोर आहे.
गांगुलीने एका कार्यक्रमात सांगितले की, ऋषभ योग्य वेळी टीम इंडियात असेल यात शंका नाही. मला आशा आहे की, ऋषभचं हे भविष्य आहे. आयरलँड आणि इंग्लडच्या दरम्यान भारतीय टी 20 मध्ये ऋषभचा खेळ पाहिला होता. गांगुलीने सांगितलं की, ऋषभ पंत आणि ईशान किशन सारख्या खेळाडूंचा आता वेळ आला आहे. या खेळाडूंनी कोणतीही घाई करू नये. वेळेनुसार यांना टीम इंडियात खेळण्याची संधी नक्की मिळेल. वेळेनुसार जास्त सामने खेळल्यावर ते अधिक परिपक्व होतील. पुढील काळात हे भारतासाठी खेळतील यात शंकाच नाही.
ऋषभ पंतचा खेळ पाहिल्यावर सौरव गांगुलीने ट्विट केलं होतं. मी 2008 मध्ये मॅकुलमचा खेळ पाहिला होता. ऋषभ पंतचा खेळ देखील तसाच आहे. असं सौरव गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं होतं. ो